July 27, 2024 12:48 PM

views 22

मन की बात कार्यक्रमातून उद्या प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता मन की बात या मासिक कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११२वा, तर मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरचा दुसरा भाग आहे.   हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून, तसंच एआयआर न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाइल ॲपवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. तसंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनल्सवरूनही कार्यक्...

July 26, 2024 8:30 PM

views 46

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या ९ व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील.  ‘विकसित भारत @ २०४७’, ही यंदाच्या बैठकीची संकल्पना आहे.    केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सहभागात्मक प्रशासन आणि सहयोगाला चालना देण्याबरोबर, ग्रामीण आणि शहरी भागातल्या जनतेच्या जीवनाचा दर्जा सुधारणं, हे या बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं नीती आयोगानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी महत्वाच्या असलेल्य...

July 23, 2024 3:19 PM

views 24

समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास साधणारा अर्थसंकल्प – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थसंकल्प हा ग्रामीण, दुर्बल तसंच शेतकऱ्यांना समृद्धीची वाट दाखवणारा आणि युवावर्गासाठी संधी निर्माण करणारा आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिली. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास साधणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले.     २०४७ सालच्या विकसित भारताच्या उद्दिष्टाची पायाभरणी या अर्थसंकल्पातून करण्यात आली असून देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठीची ही सुरुवात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

July 20, 2024 8:30 PM

views 26

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांना नव्या उंचीवर नेण्यासाठी द्विपक्षी सहकार्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांत परस्परसंमतीनं द्विपक्षी सहकार्य करण्यावर या संवादात सहमती झाली. व्यापार आणि आर्थिक सहकार्य, पशुपालन, औषधनिर्मिती, शिक्षण आणि अंतराळ आदी क्षेत्रांचा यात समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय प्रवाशांच्या हिताची काळजी घेतल्याबद्दल प्रधानमं...

July 21, 2024 11:30 AM

views 26

जागतिक वारसा समितीचं ४६वं अधिवेशनाचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता याचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री, राजदूत आणि तज्ञ उपस्थित राहणार आहेत. भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं यजमानपद भूषवणार आहे. हे अधिवेशन वर्षातून एकदा होतं.

July 18, 2024 8:25 PM

views 24

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांकडून वापरले जाणारे शब्द चिंतेची बाब – मंत्री अश्विनी वैष्णव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांकडून वापरले जाणारे शब्द ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं सांगत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांवर टीका केली. सार्वजनिक जीवनात शब्दांची निवड खूप महत्त्वाची असते. त्यामुळे विरोधकांनी असंसदीय शब्द टाळावेत, असं ते म्हणाले.   तत्पूर्वी काही राजकीय पक्षांकडून तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी असंसदीय शब्द वापरले जाणं दुर्दैवी असल्याचं मत भाजपचे वक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही व्यक्त केलं. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बो...

July 17, 2024 3:15 PM

views 31

आषाढी एकादशी निमित्त प्रधानमंत्री यांनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठालाचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो तसंच आनंद आणि समृद्धीने भरलेला समाज निर्माण होवो असं समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे.

July 17, 2024 12:44 PM

views 24

केंद्र सरकारनं नीती आयोगाची केली पुनर्रचना

केंद्र सरकारनं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कायम असून, सुमन बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहातील. विशेष निमंत्रितांमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा समावेश आहे. व्ही के सारस्वत, प्रो. रमेश चंद, डॉ व्ही के पॉल आणि आनंद विरमानी हे आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत.

July 15, 2024 12:29 PM

views 32

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी झाले आहेत.यामध्ये गेल्या 3 वर्षात 3 कोटी लोकांची भर पडली.मोदींना आता X वर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होण्याचा मान मिळाला आहे.   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे एकंदर 3 कोटी 8० लाख 6 हजार तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे 65 लाख अनुयायी आहेत.या माध्यमावरील चर्चा,वादविवाद,विचार,नागरिकांच्या शुभेच्छा आणि ग्राह्य धरावेत अशा टीका यांची दखल घेणं हा आनंददायी अनुभव असून भविष्यातही संवादाचं हे माध्यम असंच साथ देत राही...

July 15, 2024 11:43 AM

views 24

गेल्या १० वर्षांत देशातली हवाई वाहतूक सेवा जगात तिसऱ्या स्थानावर – मुरलीधर मोहोळ

  गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर हे क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल सांगितले.   पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.नव्या टर्मिनलवरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग ...