October 9, 2024 8:09 PM October 9, 2024 8:09 PM

views 14

वेगवान विकास महाराष्ट्राने याआधी कधीही पाहिला नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यात गेल्या काही वर्षात विकासाचे अनेक प्रकल्प सुरू झाले आणि त्यातले अनेक पूर्ण झाले आहेत, यापूर्वी एवढा वेगवान विकास महाराष्ट्राने पाहिलेला नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यातल्या सुमारे सात हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीने केली त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हे मराठी माणसाचं स्वप्न नुकतंच केंद्रसरकारच्या निर्णयामुळे साकार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.   राज्यात...

October 8, 2024 8:09 PM October 8, 2024 8:09 PM

views 8

हरयाणातलं भाजपाचं यश हा सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय – प्रधानमंत्री

हरयाणातलं भाजपाचं यश हा सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हरयाणातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यात कसलीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या विजयाचं श्रेय समर्पण भावनेनं अथक परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.    जम्मू-कश्मीरमधून ३७० वं कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झालं, आणि तिथल्या जनतेनं लोकशाहीवरचा विश्वास दाखवून दिला, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं...

October 8, 2024 8:51 PM October 8, 2024 8:51 PM

views 17

राज्यातल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्या प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

राज्यातल्या १० नव्या शासकीय महाविद्यालयांचं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये ही महाविद्यालयं आहेत. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीसह केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसह वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्री...

October 8, 2024 3:01 PM October 8, 2024 3:01 PM

views 8

वाशिममधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

वाशिम जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या महाविद्यालयाला दोन वर्षांपूर्वी राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली होती.

October 7, 2024 10:54 AM October 7, 2024 10:54 AM

views 14

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारताचा वेगाने विकास- किरेन रिजीजू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारत  विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन संसदीय व्यवहार आणि अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजीजू यांनी केलं आहे.   काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, रिजीजू यांनी मणिपूरमधील काही घटना वगळता संपूर्ण ईशान्य भारतात शांतता असल्याचं रिजीजू म्हणाले. काँग्रेसनं ईशान्य भागाच्या विकासासाठी ठोस काम केलं नसल्याचा आरोप करत, केंद्रात मोदींची सत्ता आल्यापासून दहा हजारांहून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचंही रिजीजू या...

October 5, 2024 7:38 PM October 5, 2024 7:38 PM

views 3

विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी एकत्रितरित्या काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

  सर्वजण एकत्र राहून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करू, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममधल्या पोहरा देवी इथं केलं. राज्यातल्या डबल इंजिन ८सरकारनं नागरिकांच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. नदी जोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असं ते म्हणाले.   प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १८ व्या, आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ५ व्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्र्यांनी आज केलं. तसंच कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत १ हजार ९२० कोटी रुपयांच...

October 3, 2024 1:27 PM October 3, 2024 1:27 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाच्या तारखेत वाढ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या  इ-लिलावाची तारीख आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा लिलाव १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार होता. प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेट वस्तूंच्या लिलावाची ही ६वी आवृत्ती असून यातून मिळणारं धन नमामि गंगे प्रकल्पासाठी  वापरलं जाणार असल्यामुळे नागरिकांनी मोठया संख्येनं लिलावात बोली लावून या कार्यात योगदान द्यावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे. उत्कृष्ट कलाकृती, मंदिरांच्या प्रतिकृती, हिंदू देवतांच्या मू...

October 1, 2024 8:07 PM October 1, 2024 8:07 PM

views 7

काँग्रेस जाती-पातीचं राजकारण करत असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका

काँग्रेस जाती-पातीचं राजकारण करत असल्याची टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज हरयाणात पलवल इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेसनं ७० वर्ष सत्तेत असूनही जनतेला रस्ते, वीज, पाणी, शौचालयं, घरं अशा मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं, जम्मू-कश्मीरमधे देशाची राज्यघटना राबवण्यात अडथळे निर्माण केले, ३७० कलम रद्द करायला आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोध केला, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपानं देशापुढचे प्रश्न पूर्णपणे गांभीर्यानं सोडवले, असं मोदी म्हणाले.   ...

September 29, 2024 1:26 PM September 29, 2024 1:26 PM

views 2

‘मेक इन इंडिया’ अभियानामुुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या महत्वाच्या अभियानाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरणही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केलं. या अभियानानं गरीब, मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला. या अभियानानं प्रत्येक घटकाला आपली प्रतिभा जगासमोर आणायची संधी दिली असं ते म्हणाले. या अभियानामुळे आज भारत उत्पादनाचं केंद्र बनला आहे, प्रत्येक क्षेत्रातली निर्यात वाढली आहे आहे असं त्यांनी सांगितलं. परकीय गुंतवणुकीचं वाढतं प्रमाण हे या अभियानाची यशोगाथा सांगतं असं ते म्ह...

September 29, 2024 3:38 PM September 29, 2024 3:38 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर २ हजार ९५५ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो स्वारगेट- कात्रज विस्ताराची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजनही मोदी यांनी केलं....