October 16, 2024 8:30 PM October 16, 2024 8:30 PM
3
संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही – प्रधानमंत्री
संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही. त्यामुळेच हे कलाप्रकार सर्वांना समजू शकतात, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारतीय नृत्यावर आधारीत पहिल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ते बोलत होते. सहा दिवस चालणाऱ्या महोत्सवाचं आयोजन संगीत नाटक अकादमीनं केलं आहे. युवा वर्गासाठी प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशात नृत्याचं महत्त्व सांगितलं. भारतीय संस्कृतीचा नृत्य हा अविभाज्य घटक आहे. युवा वर्गानं अशा उत्सवांत सहभागी होऊन आपल्या संस्कृतीची ज...