November 1, 2024 9:48 AM
7
‘एक राष्ट्र एक नागरी संहिते’च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू – प्रधानमंत्री
'एक राष्ट्र एक नागरी संहिता' म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेने देश वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरदार पटेल यांचं दीडशेवं जयंती वर्ष सुरु होत असून, पुढचे दोन वर्ष हा जयंतीउत्सव देशभर साजरा केला जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशांत सर्वत्र लागू असलेलं आधार कार्ड, जीएसटी कर प्रणाली यांचं यश अधोरेखित करत त्यांनी, एकज...