October 5, 2024 3:09 PM

views 25

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यात ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

दुपारी ठाण्यात ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि घाटकोपर जवळच्या छेडा नगरपासून ठाण्यातल्या आनंद नगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारीत भागाची पायाभरणी प्रधानमंत्री करतील. याशिवाय नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांच्या पहिल्या टप्पा, ठाणे महापालिकेच्या नव...

October 5, 2024 10:51 AM

views 29

जगाच्या विविध भागांमध्ये लवकरच सुरू होणार भारताचे पाच सेमीकंडक्टर प्लांट

जगाच्या विविध भागांमध्ये भारताचे पाच सेमीकंडक्टर प्लांट लवकरच सुरू होणार असून येत्या काही काळात भारतीय बनावटीच्या चिप्स जगाला उपलब्ध होतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. दिल्लीत झालेल्या कौटिल्य आर्थिक परिषदेला ते काल संबोधित करत होते.   भारताचे स्थान मोबाईल आयातदार ते मोबाईल उत्पादक असे बदललं असून प्रत्येक क्षेत्रात गुंतवणुकीच्या भरपूर संधी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. भारत वेगाने वृद्धिंगत होणारी जगातली पाचवी अर्थव्यवस्था असल्याचे अधोरेखित करुन...

October 2, 2024 7:57 PM

views 24

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम

गांधी जयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत भाग घेतला. यावेळी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोबरधन योजनेअंतर्गत १५ बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे.    अमृत-२ योजनेंतर्गत सातारा पालिकेच्‍या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्‍पाचं तस...

September 28, 2024 1:42 PM

views 25

जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू इथं प्रचारसभेत बोलत होते. या निवडणुकांनंतर जम्मू काश्मीरमध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाईल असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरच्या ४० मतदार संघांमध्ये येत्या मंगळवारी मतदान होणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचीही  प्रचारसभा आज जम्मू इथं होणार आहे.   दरम्यान, केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूका शांततेत पार पडत असल्या...

September 28, 2024 3:00 PM

views 20

थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली

थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाभिमानासाठी प्राणांची आहुती देणारे भगतसिंग अमर शहीद असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे. शहीद भगतसिंगांनी केवळ ब्रिटिश राजसत्तेला आव्हान दिलं असं नव्हे तर मातृभूमीचं स्वातंत्र्य आणि समृद्धीकरता आयुष्य अर्पण केलं असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.  

September 28, 2024 8:54 AM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्या पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचं लोकार्पण

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारीमेट्रो मार्गाचं लोकार्पण उद्या दुपारी साधारण 12 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यानंतर स्वारगेट इथल्या गणेश कला क्रीडा मंच इथ ...

September 22, 2024 3:54 PM

views 19

सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा प्राधान्यक्रम – प्रधानमंत्री

मुक्त, खुलं, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद - प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा एक सामायिक प्राधान्यक्रमावरचा विषय आहे, आणि त्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेत डेलावेर इथं झालेल्या क्वाड देशांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सध्या जग तणाव आणि संघर्षानं वेढलेलं असताना ही परिषद होत आहे, अशावेळी क्वाड सदस्य देशांनी सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर एकत्र काम करणं संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्वाचं असल्याचं ते...

September 22, 2024 1:49 PM

views 27

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या घेतल्या भेटी

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांनी बायडेन यांच्या डेलावेर इथल्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतल्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या नव नव्या संधींवर चर्चा केली. ही चर्चा अत्यंत फलदायी ठरल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून सांगितलं. जपानचे प्रधानमंत्री फुमियो कीशीदा आणि ऑस्ट्रेलियाचे ...

September 17, 2024 2:08 PM

views 24

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमीत्त त्यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी संवाद साधला. मणिपूरमधला हिंसाचार वांशिक स्वरुपाचा आहे, आणि तो रोखण्यासाठी सरकार कुकी आणि मैतेई या दोन्ही समुदायांसोबत चर्चा करत आहे, असं त्यांनी सांगितलं. तिथली परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त क...

September 11, 2024 1:38 PM

views 19

जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा

जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी असं आपलं स्वप्न असून सेमिकंडक्टरचं पावर हाऊस होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते भारत करेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी सेमिकॉन इंडिया २०२४ चं ग्रेटर नोएडा इथं आज उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. सेमिकंडक्टर कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. या दशकाच्या शेवटापर्यंत इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातली उलाढाल ५...