September 6, 2024 8:23 PM September 6, 2024 8:23 PM

views 43

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला उंच उडी प्रकारात सुवर्णपदक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं २ मीटर ८ सेंटीमीटर उंच उडी मारली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल प्रवीण कुमारचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच भारताची पदकसंख्या २६वर गेली आहे. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कास्यपदकांचा समावेश आहे.  पावर लिफ्टिंगमध्ये कस्तुरी राजमणी महिलांच्या ६७ किलो वजनी गटात आज मैदानात उतरेल. भावनाबेन अजबजी चौधरी महिलांच्या भालाफेकीत, तर ...

September 5, 2024 9:41 AM September 5, 2024 9:41 AM

views 17

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेक प्रकारात रौप्यपदक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई केली. तिरंदाजी मध्ये पुरुषांच्या रिकर्व ओपन स्पर्धेत हरविंदर सिंहने सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला तीरंदाज ठरला आहे. पुरुषांच्या क्लब थ्रो एफ - 51 प्रकारात धर्मवीर याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच स्पर्धेत प्रणव सुरमानं रौप्य पदक जिंकलं. गोळाफेक एफ 46 प्रकारात सचिन खिलारीनं रौप्यपदकाची कमाई केली. सचिन हा सांगली जिल्ह्यातल्या करगणी इथला रहिवासी आहे. त्याने १६ पूर्णांक ३२ मीटर अंत...

September 4, 2024 9:26 AM September 4, 2024 9:26 AM

views 22

पॅरीस पॅरालिंपिक्स स्पर्धेत भारताला मिळाली ५ पदकं

पॅरिस इथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पदकतालिकेत पाच पदकांची भर टाकली. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दीप्ती जीवनजी हिने कास्य पदक पटकावलं तर पुरुषांच्या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य आणि मरियप्पन थंगवेलू याने कास्य पदक पटकावलं. भालाफेकीत अजित सिंह आणि सुंदर गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदकाची कमाई केली. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचं दूरध्वनीवरुन अभिनंदन केलं. आपल्या खेळाडूंचा देशाला अभिमान असल्याचं त्यांनी...

September 2, 2024 8:27 PM September 2, 2024 8:27 PM

views 84

पॅरिस पॅरालम्पिकमध्ये नितेश कुमारला सुवर्ण, तर योगेश कथुनिया याला रौप्य पदक

पॅरिस पॅरालिम्पिकचा आजचा पाचवा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला. बॅडमिंटनपटू नीतेश कुमार यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेल याचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि भारताची पदकसंख्या नऊवर नेली. तत्पूर्वी भालाफेकपटू योगेश कथुनिया यानं रौप्यपदक पटकावलं. त्यानं ४२ मीटर २२ सेटींमीटर अंतरावर भाला फेकला.    बॅडमिंटनपटू तुलसीमती मृगेशन हिनं मनीषा रामदास हिच्यावर मात करत अंतिम फेरीत धडक मारून आणखी एक पदक निश्चित केलं. आता तिचा पुढचा सामना चीनच्या प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे. त...

August 31, 2024 11:22 AM August 31, 2024 11:22 AM

views 142

पॅरीस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखराची सुवर्ण पदकाला गवसणी

पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारतानं एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं अशी चार पदकं मिळवली. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग प्रकारात आज भारताच्या अवनी लेखरानं नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. तिनं २४९ पूर्णांक ७ दशांश गुण मिळवत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालनं २२८ पूर्णांक ७ दशांश गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावलंं. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल एस एच वन प्रकारात मनीष नारवालने रौप्यपदक जिंकलं.   महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्य...

August 20, 2024 9:15 AM August 20, 2024 9:15 AM

views 12

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. हा प्रवास या खेळाडूंसह भारतासाठीही खूप महत्त्वाचा असल्याची भावना पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून खेळाडूंशी बोलताना व्यक्त केली. तसंच 140 कोटी भारतीयांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत, असं सांगत त्यांना शुभेच्छाही दिल्या. पॅरालिम्पिक्ससाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू पाठविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. 84 खेळाडू पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये भारत...