डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. हा प्रवास या खेळाडूंसह भारतासाठीही खूप महत्त्वाचा असल्याची भावना पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून खेळाडूंशी बोलताना व्यक्त केली. तसंच 140 कोटी भारतीयांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत, असं सांगत त्यांना शुभेच्छाही दिल्या. पॅरालिम्पिक्ससाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू पाठविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. 84 खेळाडू पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असून यातील 50 टक्के खेळाडू पहिल्यांदाच पॅरालिम्पिक्समध्ये खेळत असल्याची माहितीही त्यांनी दिली.