July 14, 2024 3:30 PM July 14, 2024 3:30 PM
38
पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान बेकायदेशीर विवाह प्रकरणातून निर्दोष मुक्त
पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना बेकायदेशीर विवाह प्रकरणातून इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. इम्रान खान यांचा विवाह इस्लामिक कायद्यानुसार झाला नसल्याचा आरोप करत तो रद्दबातल ठरवण्याची मागणी करणारा खटला न्यायलयाने फेटाळला.