December 13, 2024 12:12 PM

views 50

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी तोषखाना प्रकरणात दोषी

पाकिस्तानच्या एका न्यायालयाने पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तोषखाना प्रकरणात दोषी ठरवलं आहे. सौदी राजघराण्याने मे 2021 च्या भेटीमध्ये काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या त्या वस्तू सरकारी तोषखान्यात जमा करण्याऐवजी इम्रान खान यांनी स्वतःकडे ठेवल्या होत्या असा आरोप पाकिस्तानच्या एन ए बी नं केला आहे. इम्रानखान यांच्यावर  सध्या अनेक आरोप असून ते रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात आहेत.

December 4, 2024 8:21 PM

views 32

पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या विजेतपदासाठी भारताची पाकिस्तानशी लढत

ओमान इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं मलेशियाला ३-१ ने नमवत अंतिम फेरी गाठली होती. तर पाकिस्तानी संघानं जपानच्या संघावर ४-२ असा विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आहे. या स्पर्धेचं विजेतेपद म्हणजे भारतीय संघासाठी विजयाची हॅटट्रिक असणार आहे.

November 26, 2024 7:22 PM

views 38

पाकिस्तान इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात करण्याची गृहमंत्रालयाची घोषणा

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं तेहरीक ए इन्साफ पक्षाचे समर्थक आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत सहा जवानांचा मृत्यू झाल्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात करण्याची घोषणा आज गृहमंत्रालयाने केली. आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तसंच आवश्यकता असेल तर गोळीबार करण्याचे सुरक्षा दलाला गृहमंत्रालयानं दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे असं वाटलं तर संचारबंदी लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्...

October 23, 2024 10:20 AM

views 53

कर्तारपूर साहिब कॉरिडॉर कराराची वैधता आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्यास भारत आणि पाकिस्तानची मान्यता

भारत आणि पाकिस्ताननं कर्तारपूर साहिब कॉरिडॉर कराराची वैधता आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचं मान्य केलं आहे. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरद्वारे भारतातील यात्रेकरूंना पाकिस्तानमधील कर्तारपूर इथल्या पवित्र गुरुद्वारा दरबार साहिब, नारोवाल या ठिकाणांना भेट देता येते. यापूर्वी पाच वर्षांसाठी 24 ऑक्टोबर 2019 मध्ये हा करार करण्यात आला होता, त्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.   दरम्यान, प्रत्येक यात्रेसाठी पाकिस्तानकडून आकारलं जाणारं 20डॉलर सेवा शुल्क काढ...

October 17, 2024 3:15 PM

views 43

SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सामना आज पाकिस्तान बरोबर

नेपाळमध्ये सुरू असलेल्या SAFF महिलांच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचा सलामीचा सामना आज पाकिस्तान बरोबर होत आहे. संध्याकाळी सव्वा पाच वाजता सामना सुरू होईल. स्पर्धांच्या अ गटात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश असून ब गटात नेपाळ, भूतान, मालदिव आणि श्रीलंकेचा समावेश आहे. अंतिम सामना ३० तारखेला खेळला जाणार आहे.

October 14, 2024 2:26 PM

views 7

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज संध्याकाळी साडे ७ वाजता सामना होणार आहे.   पाकिस्तान हा सामना जिंकला तर भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करायची संधी मिळेल. अ गटात ऑस्ट्रेलियानं काल भारतीय संघाला पराभूत केलं. त्यामुळं उपांत्य फेरीतली त्यांची जागा निश्चित झाली आहे.

October 5, 2024 2:56 PM

views 61

इस्लामाबाद राजधानीच्या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान लष्कराकडे सोपवण्याचा पाकिस्तान सरकारनं निर्णय

पाकिस्तान सरकारनं इस्लामाबाद या राजधानीच्या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्यानं होत असलेली हिंसक निदर्शनं, आंदोलनं, विस्कळीत मोबाईल आणि इंटरनेट सेवा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्लामाबाद आणि रावळपिंडी या शहरांमध्ये तेहरीक- ए-इन्साफ आणि सुरक्षा दलांमध्ये काल मोठ्या प्रमाणावर चकमकी उडाल्या.

September 11, 2024 1:42 PM

views 38

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात BSF चा एक जवान जखमी

पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करत जम्मू - काश्मिरमध्ये अखनूर इथल्या नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.   मध्यरात्री अडीचच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ असलेल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिली. या घटनेनंतर जवानांना अधिक सतर्क राहण्याच्या तसंच सीमाभागातील गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

September 10, 2024 1:14 PM

views 43

पाकिस्तानमधे तहरीक ए इन्साफ पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांकडून अटक

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे काल रात्री माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांनी अटक केली.  या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये ८ सप्टेंबर रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांनी यावेळी वाहतुकीचे नियम मोडत सामान्यांसाठी निर्धारित असलेल्या रस्त्यावर मोर्चा नेला. त्यांना रोखणाऱ्या जवानांवर दगडफेक झाल्याने पोलिसांनी संरक्षणासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर या मोर्चेकऱ्यांना अटक झाल्याची ...

September 7, 2024 8:01 PM

views 36

पाकिस्तानात सुरक्षा दलांनी आज केलेल्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलांनी आज केलेल्या कारवाईत चार आत्मघातकी दहशतवादी हल्लेखोर मारले गेले. या हल्लेखोरांनी मोहम्मद जिल्ह्यातल्या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर या प्रांतात इतरत्र लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी लष्करानं मोहिम  सुरू केली  आहे.