February 14, 2025 10:27 AM February 14, 2025 10:27 AM

views 14

पाकिस्तान जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक – ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्था

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात पाकिस्तान जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. न्यायव्यवस्था आणि समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही समस्या पसरली असल्याचं देखील अहवालात म्हणलं आहे.   महागाई वाढत असल्यामुळे लोकांना आरोग्यासह अनेक मूलभूत सेवांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जावर देशाची अर्थव्यवस्था टिकून असल्याचं यात सांगितलं आहे.

January 17, 2025 8:23 PM January 17, 2025 8:23 PM

views 12

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अल-कादिर विद्यापीठ ट्रस्ट प्रकरणी १४ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुरुंगात उभारलेल्या तात्पुरत्या न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ही शिक्षा सुनावली. तुरुंगवासाच्या शिक्षेसोबतच इम्रान खान यांना १० लाख पाकिस्तानी रुपये आणि त्यांच्या पत्नीला ५ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

January 12, 2025 2:09 PM January 12, 2025 2:09 PM

views 11

पाकिस्तानमध्ये कोळसा खाण दुर्घटनेत, अकरा ठार

पाकिस्तानमध्ये कोळसा खाण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या अकरा झाली आहे. कोसळलेल्या खाणीतून बचाव कार्य करताना काल अजून सातजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.   ही खाण बलुचिस्तानच्या क्वेटा शहरापासून 40 किलोमीटर असून गुरुवारी रात्री मिथेन साचून झालेल्या स्फोटामुळे ती कोसळली होती. दुर्घटनास्थळी शोध आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे.  

January 11, 2025 8:20 PM January 11, 2025 8:20 PM

views 10

पाकिस्तानात झालेल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता

पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातल्या एका कोळसा खाणीत मिथेन गॅसचा स्फोट होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ कामगार बेपत्ता आहेत. गुरुवारी रात्री हा स्फोट झाला होता.

January 6, 2025 8:00 PM January 6, 2025 8:00 PM

views 18

पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताकडून निषेध

पाकिस्तानने अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी  आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याच्या वृत्तांची दखल भारत सरकारने घेतली असून विशेषतः महिला आणि मुलंही बळी गेल्याचा भारत निषेध करत आहे. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजाऱ्यांना दोष देणं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याची टीका भारतानं केली आहे.

January 3, 2025 1:47 PM January 3, 2025 1:47 PM

views 13

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरु

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कालपासून सुरु झाला. या पाच देशांच्या जबाबदारीचं प्रतीक म्हणून त्यांचे ध्वज रोवण्याचा कार्यक्रम काल सुरक्षा परिषदेच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात झाला. इक्वाडोर, जपान, माल्टा, मोझाम्बिक आणि स्वित्झरलँड यांची जागा या देशांनी घेतली आहे.

January 1, 2025 8:19 PM January 1, 2025 8:19 PM

views 10

भारत आणि पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांच्या याद्या सादर

भारत आणि पाकिस्तानने आपापाल्या अणुप्रकल्पांच्या याद्या एकमेकांना सादर केल्या. उभय देशांमधे अणुप्रकल्पांवर संभाव्य हल्ला रोखण्याच्या दृष्टीनं झालेल्या कराराचा भाग म्हणून दरवर्षी जानेवारीत या याद्या सादर केल्या जातात.

December 25, 2024 3:29 PM December 25, 2024 3:29 PM

views 17

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यु

अफगाणिस्तानमध्ये, पक्तिका प्रांतातल्या बरमल जिल्ह्यावर काल रात्री पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जण मृत्युमुखी पडले. तालिबान या दहशतवादी संघटनेवर लक्ष्य साधत अफगाणिस्तान बरोबरच्या आपल्या सीमे लगतच्या डोंगराळ भागात पाकिस्ताननं हा हल्ला केल्याचं स्थानिक वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मात्र या वृत्ताला अधिकृतपणे स्वीकृती दिली नाही. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांची उपस्थिती वाढत असून, दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला.

December 17, 2024 6:42 PM December 17, 2024 6:42 PM

views 6

ट्रॅव्हल एजंटकडून फसवणुकीमुळे पाकिस्तानात अडकलेली भारतीय महिला मायदेशी परतली

ट्रॅव्हल एजंटकडून फसवणूक झाल्याने पाकिस्तानात अडकलेली एक भारतीय महिला २२ वर्षांनी मायदेशी परतली आहे. हमीदा बानो असं या महिलेचं नाव असून त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अटारी सीमेवर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर हमीदा यांना वैद्यकीय उपचारांसाठी अमृतसर इथल्या गुरुनानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ट्रॅव्हल एजंटने नोकरीचं आमीष दाखवून त्यांची फसवणूक केल्याने त्या पाकिस्तानमधे सिंध प्रांतातल्या हैदराबाद इथे अडकल्या होत्या. आपण मायदेशी परतू अशी कल्पनाही केली...

December 15, 2024 8:20 PM December 15, 2024 8:20 PM

views 11

१९ वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा पराभव

१९ वर्षाखालच्या क्रिकेटमधे, मलेशियात क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं अ-गटातल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानच्या महिला संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.  प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव भारतानं ७ बाद ६७ वर रोखला. सोनम यादवनं ४ षटकात फक्त ६ धावा देत ४ बळी घेतले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कमलिनी आणि सानिका चाळके यांनी तडाखेबंद भागीदारी करत ७ षटकं आणि ५ चेंडूत भारताला विजय मिळवून दिला. कमलिनीनं २९ चेंडूत ४४ धावा केल्या. ती सामन्यातली सर्वोत्क...