December 21, 2025 1:30 PM December 21, 2025 1:30 PM
210
१९ वर्षांखालील क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय
भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालच्या मुलांच्या संघांमध्ये आज दुबई इथं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या डावाला वेगानं सुरुवात केली. भारतानंही चौथ्याच षटकात सलामीवीर हमझा याला बाद करत पाकिस्तानला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीवीर समीर मीनहास यानं दमदार शतकी खेळी करत, आधी दुसऱ्या गड्यासाठी उस्मान खान याच्यासोबत ९१, तर तिसऱ्या गड्यासाठी अहमद हुसेन याच्यासोबत १३७ धावांची भागिदार...