April 23, 2025 10:39 AM April 23, 2025 10:39 AM
14
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यासह २ परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात २० पर्यटक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अद्याप ओळख पटवण्याचं आणि बचावकार्य सुरू असल्यामुळे मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा स्पष्ट नसल्याचं सुरक्षा दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, या भ्याड ह...