April 27, 2025 1:29 PM April 27, 2025 1:29 PM

views 8

जम्मू-काश्मिर विधानसभेचं सोमवारी विशेष अधिवेशन

जम्मू - काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी उद्या विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यु झाला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात येईल, त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल, आणि या घटनेचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात येईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या...

April 27, 2025 10:17 AM April 27, 2025 10:17 AM

views 5

NIA कडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास

गृह मंत्रालयानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला असून, एन आय ए आता या हल्ल्याच्या घटनेची औपचारिक चौकशी करेल. एनआयएच्या पथकानं याआधी दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली होती. जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाममधील बैसरन वनक्षेत्रात 22 तारखेला हा हल्ला झाला होता, ज्यामध्ये 26 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

April 26, 2025 1:26 PM April 26, 2025 1:26 PM

views 7

पाकिस्तानबरोबरचा सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय – केंद्रीय गृहमंत्री

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरचा सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे न्यायसंगत असून राष्ट्र...

April 26, 2025 12:49 PM April 26, 2025 12:49 PM

views 9

दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्याचा तीव्र  शब्दांत निषेध केला आहे. जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असून सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज आहे, असं परिषदेच्या सदस्यांनी म्हटलं आहे.   पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार, समर्थक आणि प्रायोजक यांना शिक्षा देण्याचं आवाहन त्यांनी केलं. या प्रकरणी सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. आपली संघटना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्र...

April 26, 2025 12:44 PM April 26, 2025 12:44 PM

views 9

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल रात्री काश्मीर भागात शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन केलं. याला भारतीय सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं.   या चकमकींमध्ये भारतात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास विविध यंत्रणा करत आहेत. संपूर्ण काश्मीर जिल्ह्यात शोधमोहिमा राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचं विशेष पथकही तपासकार्यात गुंतलं आहे.

April 26, 2025 10:24 AM April 26, 2025 10:24 AM

views 17

केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात जाहीर केलेल्या उपाययोजनांना काँग्रेसचा पाठिंबा

पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात जाहीर केलेल्या उपाययोजनांना काँग्रेसचा पाठिंबा आहे, याचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल केला.   जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या गांधी यांनी काल प्रथम श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. दहशतवादाचा कणा मोडून टाकण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन गांधी यांनी दिलं. 

April 26, 2025 10:22 AM April 26, 2025 10:22 AM

views 17

पहलगाम ल्ल्याची माहिती इतर राष्ट्रांना समजावी, या दृष्टीनं भारताकडून एक व्यापक राजनैतिक मोहीम

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती इतर राष्ट्रांना समजावी, या दृष्टीनं भारतानं एक व्यापक राजनैतिक मोहीम हाती घेतली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दोन दिवसांपूर्वी  काही देशांच्या राजदूतांना बोलावून या हल्ल्याची माहिती दिली होती. काल अमेरिका, इस्राएल आणि स्पेनच्या राजदूतांना बोलावून ही माहिती देण्यात आली.

April 26, 2025 9:53 AM April 26, 2025 9:53 AM

views 7

भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं परत पाठविण्याच्या गृहमंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना

 भारतात आलेल्या, सध्या वास्तव्यास असलेल्या  पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना दिल्या.    या संदर्भात त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. काल नवी दिल्ली इथून 191 पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार झाली आहे. त्यांनी तात्काळ देश सोडावा यासाठी प्रयत्न केले जातील, दिरंगाई झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्राचे म...

April 25, 2025 3:22 PM April 25, 2025 3:22 PM

views 4

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची शोधमोहीम जारी

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून व्यापक शोध मोहीमा राबवल्या जात आहेत. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बाज़ीपोरा कुलनार वनक्षेत्रात काही दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानं पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकानं या भागातली घेराबंदी अधिक कठोर केली आहे.   आज सकाळी दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. दरम्यान, पंजाबच्या फिरोजपूर क्षेत्रात तैनात असलेला सीमा सुरक्षा दलाचा एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानं पाकिस्तानी सैन्यानं त्याला ताब्यात घेतलं आहे.

April 25, 2025 3:17 PM April 25, 2025 3:17 PM

views 14

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचना

पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना केल्या आहेत.   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा संदेश दिला. सिंधू जल कराराच्या संदर्भात अमित शहा संध्याकाळी बैठक घेणार आहेत. त्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.