August 10, 2025 2:10 PM

views 26

‘ऑपरेशन सिंदूर’ हे तिन्ही सेनादलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मकतेचं उदाहरण – संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मकतेचं उदाहरण आहे, असं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज सिकंदराबाद इथं संरक्षण व्यवथापन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. सशस्त्र दलांमध्ये एकत्र कृतीसाठी आवश्यक धोरणात्मक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या रुपरेषेबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. याशिवाय सध्याच्या तंत्रज्ञानावर आधारित युगात व्यापक क्षमता विकास, आत्मनिर्भरता आणि संरक्षण क्षेत्रातल्या परिवर्तनात्मक...

July 30, 2025 8:19 PM

views 27

ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूरमधून भारताचं दहशतवादी हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर – गृहमंत्री

ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं दहशतवादी हल्ल्यांना अचूक, सडेतोड आणि त्वरित प्रत्युत्तर दिलं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलं. ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात असून हे दहशतवादी पाठवणाऱ्यांना आणि खुद्द त्या दहशतवाद्यांनाही आपण संपवलं. ऑपरेशन महादेवअंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या सुलेमान, अफगाण आणि जिब्रान या लष्कर-ए-तैय्यबाच्या दहशतवाद्यांना सशस्त्र दलांनी ठार केलं, तर...

July 30, 2025 8:04 PM

views 26

ऑपरेशन सिंदूर दरम्यान खोटी माहिती प्रसारित केल्यामुळे ४००हून अधिक यूआरएल बंद – मंत्री अश्विनी वैष्णव

ऑपरेशन सिंदूर दरम्यान खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्यामुळे ४००हून अधिक यूआरएल बंद करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान चुकीची माहिती, खोट्या बातम्या आणि प्रचार मोहिमा चालवल्या गेल्याचं आढळलं असून यातले बहुतांश स्रोत हे भारताबाहेरचे होते, असंही ते यावेळी म्हणाले.

July 30, 2025 7:01 PM

views 26

ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात कुठल्याही देशानं मध्यस्थी केली नसल्याचा सरकारचा पुनरुच्चार

ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी फेटाळून लावला. ते आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान बोलत होते. युद्ध थांबवण्यासाठी जगातल्या कोणत्याही नेत्यानं मध्यस्थी केली नाही, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवर बोलताना पाकिस्तानने हल्ला केला तर भारत प्रतिहल्ला करेल असं भारतानं स्पष्ट केलं होतं, असं जयशंकर म्हणाले. भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानातील मुरीदके आणि बहावलपूर ही दहशतवाद...

July 28, 2025 6:48 PM

views 36

ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं आहे, संपलेलं नाही – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं आहे, संपलेलं नाही. पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळीक केली, तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेच्या प्रारंभी ते बोलत होते.    (या कारवाईत भारताच्या सेनादलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले ९ दहशतवादी तळ लक्ष्य केले. यापैकी ७ तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे, असं ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण...

July 26, 2025 1:43 PM

views 20

संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा

संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांना काल माध्यमांशी बोलताना दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.   संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा होणार असून त्यासाठी १६ तास देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.  न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव एकमताने मांडला जावा यावर बैठकीत एकमत झाल्याचं रिजिजू यांनी सांगितलं...

June 4, 2025 7:55 PM

views 21

विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या ४ बहुपक्षीय शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण

दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहिष्णुतेचं धोरण स्पष्ट करण्यासाठी जगभरातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी ४ शिष्टमंडळं भारतात परतली आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळांनी विविध परदेशी नेते, वरिष्ठ अधिकारी, प्रभावशाली विचारवंत, माध्यमं आणि भारतीय समुदायांशी संवाद साधला.   शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज सकाळी यूएई, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला भेट देऊन भारतात परतलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्र...

June 3, 2025 2:59 PM

views 27

संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची इंडिया आघाडीची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची मागणी इंडिया आघाडीने केली आहे. नवी दिल्ली इथं इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंडिया आघाडीच्या सोळा घटक पक्षांनी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याची माहिती काँग्रेस खासदार दीपेंदर सिंह हुड्डा यानी बातमीदारांना दिली.    पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सर्व विरोधी पक्ष संरक्षण दल आणि सरकारच्या ...

June 2, 2025 12:07 PM

views 24

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इजिप्तची राजधानी कैरो मध्ये दाखल झालं.   भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं  शिष्टमंडळ  फ्रांस, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे. याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं श...

May 31, 2025 1:06 PM

views 39

बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षिय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत.    काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला असून हे विधान मागे घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. ...