दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहिष्णुतेचं धोरण स्पष्ट करण्यासाठी जगभरातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी ४ शिष्टमंडळं भारतात परतली आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळांनी विविध परदेशी नेते, वरिष्ठ अधिकारी, प्रभावशाली विचारवंत, माध्यमं आणि भारतीय समुदायांशी संवाद साधला.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज सकाळी यूएई, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला भेट देऊन भारतात परतलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज देशात परतणार आहे. या शिष्टमंडळाने कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट दिली.