January 5, 2025 7:39 PM

views 14

NIA:पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या सज्जाद आलमला अटक

राष्ट्रीय तपास संस्था, एनआयएनं, फुलवारी शरीफ दहशतवादी मॉड्युल प्रकरणात पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या सज्जाद आलम या मुख्य आरोपीला काल अटक केली. पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना  दहशतवादी कारवायांना रसद पुरवत असल्याचा आरोप असून या संघटनेवर सरकारनं बंदी घातली आहे.   बिहार मधल्या पटना इथल्या एन आय ए च्या विशेष न्यायालयानं आलम याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. तो दुबईहून नवी दिल्ली विमानतळावर येताच त्याला अटक करण्यात आली. आलम दुबईतून यूएई, कर्नाटक आणि केरळ मधल्या गुन्हेगारी ने...

December 19, 2024 7:58 PM

views 13

NIA चे छत्तीसगड बिजापूर जिल्ह्यात चार ठिकाणी छापे

छत्तीसगडमधे, माओवाद्यांना केल्या जाणाऱ्या वस्तुपुरवठ्याचा तपास करण्यासाठी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं बिजापूर जिल्ह्यात चार ठिकाणी, छापे टाकले. छत्तीसगड आणि लगतच्या राज्यांमधे माओवाद्यांच्या कारवायांचा प्रभाव आणि संसाधनं रोखण्यासाठी एनआयएनं ही कारवाई केली. त्यात भैरमगड, अवापल्ली, आणि तर्रेम भागात हे छापे टाकण्यात आले.

December 19, 2024 9:45 AM

views 13

एनआयएचे शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी ४ राज्यांत छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आंतरराज्य शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी चार राज्यांत छापे घातले. बिहारमध्ये 12, नागालँडमध्ये 3 तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात प्रत्येकी एका ठिकाणी छापा घालून एनआयनं प्रतिबंधित शस्त्रास्त्रं, मोबाइल, मेमरी कार्डस आणि पेन ड्राइव्ज जप्त केले. यासह एक मोटार, सुमारे 14 लाख रुपये आणि काही कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत.

December 13, 2024 11:57 AM

views 20

जैश ए महंमद या संघटनेच्या दहशतवादी कट प्रकरणी NIA च्या आठ राज्यांत 19 ठिकाणी छापे

जैश ए महंमद या संघटनेच्या दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं काल आठ राज्यांत 19 ठिकाणी छापे घातले. या छाप्यांमधून बरीच आक्षेपार्ह कागदपत्रं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, पेन ड्राईव्ह, सीडी, हार्डडिस्क असं साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. शेख सुलतान सलाउद्दीन अयुबी या जैश ए महंमदच्या हा म्होरक्या आरोपीच्या जवळच्या साथीदारांच्या जागांवरही छापे टाकण्यात आल्याचं एनआयएकडून सांगण्यात आलं. खोटा प्रचार करणारं साहित्य वितरित केल्याच्या आरोपाखाली अयुबी ऑक्टोबरपासून एनआयएच्या कोठडीत आहे.

November 28, 2024 1:23 PM

views 10

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी साखळीसंदर्भात एनआयएचे देशात २२ ठिकाणांवर छापे

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी साखळीवर कारवाईचा भाग म्हणून एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने आज देशभरातल्या बावीस ठिकाणांवर तपास मोहीम राबवली. या तपासात म्यानमार आणि लाओसमधल्या सायबर घोटाळा घडवून आणणाऱ्या केंद्राशी असणारे संबंध उघड झाले आहेत. अनेक भारतीय नागरिकांचं क्रिप्टोकरन्सी आणि कॉल सेंटर फसवणूकीत शोषण झाल्याचं यात समोर आलं आहे.

November 26, 2024 8:01 PM

views 14

NIA: मणिपूरमधे अलिकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या ३ प्रकरणांची चौकशी

मणिपूरमधे अलिकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या ३ प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सुरु केली आहे. यातल्या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने एनआयए कडे तपास सुपूर्द केल्यानंतर तिन्ही प्रकरणात नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या २१ आणि २२ नोव्हेंबरला एनआयएच्या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. सध्या एनआयए कडे प्रकरणातली कागदपत्र सोपवण्याची प्रक्रीया सुरु आहे. 

November 14, 2024 8:14 PM

views 17

लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आरोपीच्या स्थावर मालमत्तेवर टाच

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आरोपीच्या स्थावर मालमत्तेवर टांच आणली आहे. गेल्या फेब्रुवारीत श्रीनगर इथं दोन पर्यटकांची हत्या झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या आरोपीची श्रीनगरमधली मालमत्ता जप्त करण्यात आली असून तो सध्या श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे.

October 12, 2024 8:41 PM

views 16

बागमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेची एनआयएकडून पाहणी

बागमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कर्नाटक मधून  बिहार कडे निघालेल्या बागमती एक्सप्रेसचा तामिळनाडू जवळच्या कावराई पट्टई जवळ शुक्रवारी रात्री हा अपघात झाला होता. ही एक्सप्रेस  मुख्य लाईन सोडून चुकीनं लूप लाईनवर गेल्यानं हा अपघात झाल्याचं दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक आर.एन. सिंह यांनी यावेळी सांगितलं. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांमध्ये र...

September 15, 2024 2:58 PM

views 19

एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज – गृहमंत्री अमित शहा

दहशतवाद विरोधातली संरचना बळकट करण्यासाठी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्था आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेत बोलत होते.   जम्मू-काश्मीर, कट्टर डावी विचारसरणी आणि  आणि ईशान्य भारतातील राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्या सोडवण्याच्या अनुषंगानं झालेल्या प्रगतीबद्दल तसंच माओवादा विरोधातल्या प्रयत्नांमध्ये यश मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक...

September 13, 2024 3:30 PM

views 16

पंजाब : भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान समर्थक हल्ल्याच्या चौकशीप्रकरणी NIA ची कारवाई

कॅनडातल्या भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज पंजाबमधल्या मोगा, अमृतसर, गुरदासपूर आणि जालंधरमध्ये तपासणी केली. गेल्या वर्षी, संस्थेनं ओटावा इथल्या भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या निषेधाबद्दल गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यामागे खलिस्तान समर्थकांचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.