December 18, 2025 7:05 PM
29
आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी आरोपीच्या मालमत्तांवर NIAची कारवाई
एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी एका आरोपीच्या दोन मालमत्तांवर टाच आणली आहे. यात महाराष्ट्रात ठाणे इथला एक फ्लॅट आणि बिहार मधल्या जमिनीच्या तुकड्याचा समावेश आहे. पाटणा इथल्या विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार, एनआयए नं ही कारवाई केली. संबंधित आरोपीने बेकायदेशीर मानवी तस्करीमधून मिळालेल्या पैशाचा वापर करून त्याच्या पत्नीच्या नावावर ही मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात आढळून आलं. भारतीय तरुणांची फसवणूक करून, मानवी तस्करीच्या माध्यमातून त्यांना कंब...