December 16, 2024 9:18 AM

views 17

उद्योगांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व राज्यांनी पुढाकार घ्यावा, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

छोट्या शहरांमधे उद्योग उभारणीसाठी योग्य जागा शोधून तिथं उद्योगांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना केलं आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. सरकारी प्रक्रियांमध्ये सुटसुटीतपणा आणावा जेणेकरुन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही असं प्रधानमंत्र्यांनी सुचवलं. राज्यांनी लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशासकीय कामकाजात सुधारणा करावी. लोकांना सरकारच्या विविध उक्रमांची माहिती द्यावी, असं मोदी...

December 15, 2024 2:15 PM

views 14

क्षयरोगमुक्त भारत या मोहिमेच्या जनजागृतीसाठी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगणात क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना होणार

क्षयरोगमुक्त भारत या मोहिमेच्या जनजागृतीसाठी आज नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगणात क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज या उपक्रमाचं उदघाटन झालं. पुढल्या वर्षीपर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्याचं ओम बिर्ला यांनी यावेळी सांगितलं. या विशेष सामन्यात विविध राजकीय पक्षांचे खासदार भाग घेणार आहेत. या सामन्यात दोन संघ असून लोकसभा सभापती ११ या संघाचं नेतृत्व माजी मंत्री खासदार अनुराग ठाकूर करणार असून रा...

November 9, 2024 11:25 AM

views 20

भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाला नवी दिल्लीत सुरूवात

भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाचं उद्घाटन काल नवी दिल्लीत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते झालं. जागतिक आणि भारतीय थिंक टँक, व्यावसायिक, सरकारी आणि खासगी क्षेत्रे, स्वयंसेवी संस्था आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्रित आणून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्करी वारसा यावर लक्ष केंद्रित करण्याचा या दोन दिवसीय महोत्सवाचा उद्देश आहे. यावेळी जनरल चौहान यांनी शौर्य गाथा या प्रकल्पाचा प्रारंभ केला. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी वारशाचे जतन आणि सं...

November 4, 2024 10:57 AM

views 15

आंतरराष्ट्रीय सौर भागीदारांची सातवी परिषद आज नवी दिल्लीत

आंतरराष्ट्रीय सौर भागीदारांची सातवी परिषद आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू होणार आहे. यामध्ये सदस्य देशांना सौरऊर्जा आणि त्याच्या स्वीकारार्हतेला गती देण्यासाठी तसेच वित्तपुरवठा व्यवस्था करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. भारत आणि फ्रान्स या परिषदेचं संयुक्तपणे अध्यक्षपद भूषवत आहेत.

October 22, 2024 6:02 PM

views 28

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिली. जलशक्ती मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथे राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या.   या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक संस्था, शाळा किंवा महाविद्यालय, उद्योग, सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ती संघटना, संस्था आणि नागरी संस्था अशा ९ श्रेणींमध...

October 14, 2024 10:59 AM

views 7

अमेरिका आणि भारत यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात

अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. द्विपक्षीय व्यापार, पुरवठा साखळी, सेमीकंडक्टर गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर ही परिषद होत आहे. 

October 14, 2024 10:46 AM

views 9

अमेरिका आणि भारत यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात

अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. द्विपक्षीय व्यापार, पुरवठा साखळी, सेमीकंडक्टर गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर ही परिषद होत आहे.

October 13, 2024 7:07 PM

views 19

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून सुरू

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतर विभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर सुरु होणार असून ती २१ तारखेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत चार गटांमध्ये एकूण१२ संघ सहभागी होणार आहेत. साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ आपल्या गटातल्या सर्व संघांबरोबर खेळेल.

October 8, 2024 2:28 PM

views 17

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार आहे. अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कांरान गौरवण्यात येणार आहे. याबरोबरच चित्रपट निर्मिती आणि अभिनयासाठीच्या इतर पुरस्कांरांचंही वितरण होणार आहे. कन्नड चित्रपट कांतारा मधल्या अभिनयासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तमिळ चित्रपट थिरूचित्रमबलमसाठी नित्या मेनन आणि गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेससाठी मानसी पारेख यांना देण्यात येणा...

October 3, 2024 1:32 PM

views 15

नवी दिल्लीत भारतीय नौदलाची तीन दिवसीय परिषद

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात सुरक्षितता आणि भूराजकीय संदर्भ या विषयावर भारतीय नौदलाची तीन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्ली इथं होत आहे. सागरी क्षेत्रात साधनसंपत्तीचे नवे स्रोत आणि त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचे परिणाम याविषयी परिषदे उच्च स्तरीय विचारविमर्श होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या परिषदेला संबोधित करणार आहेत.