October 8, 2025 7:29 PM October 8, 2025 7:29 PM

views 136

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, आणि मुंबई १ ॲपचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकिट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयटीआयमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला.   ८ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं. डिसे...

September 13, 2025 3:41 PM September 13, 2025 3:41 PM

views 11

नवी मुंबई विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार

नवी मुंबई विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक-उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी काल ही माहिती दिली. देशातला हा सर्वात मोठा विमानतळ लंडनच्या हीथ्रो विमानतळाच्या बरोबरीचा असेल.  येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. हा विमानतळ जलमार्गालाही जोडण्यात येणार असून गेटवे ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणाहून जलमार्गाने त्यावर पोहोचणं शक्य होईल.

March 16, 2025 7:28 PM March 16, 2025 7:28 PM

views 14

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर

नवी मुंबईतल्या  नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर पडलं आहे. अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज या विमानतळाच्या बांधकामाला भेट दिली आणि  येत्या जूनमधे त्याचं उद्घाटन होईल असं समाजमाध्यमावर लिहीलं आहे. या आधी येत्या १७ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल, असं अदानी समूहातर्फे सांगण्यात आलं होतं. अदानी उद्योगसमूह आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या या विमानतळाची क्षमता एका वर्षात ९ कोटी प्रवाशांची ये-जा हाताळण्याची असेल.