January 21, 2026 1:51 PM

views 49

अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांची सेवानिवृत्तीची घोषणा

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी नासामधल्या आपल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली आहे. गेल्या महिन्याच्या २७ तारखेपासून त्या सेवानिवृत्त झाल्याची माहिती  नासानं आज दिली. सुनिता विल्यम्स यांनी आपल्या सेवाकाळात ३ अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेत अंतराळात ६०८ दिवस काढले आहेत. याचबरोबर त्यांनी ९ वेळा मिळून ६२ तासाचं स्पेसवॉकही केलं आहे. अंतराळ क्षेत्रातल्या महिलांचा  हा एक विक्रम आहे.

January 18, 2026 2:56 PM

views 31

नासाचं ५० वर्षांहून अधिक कालावधीतील पहिल्या मानवी चंद्र मोहिमेसाठी नवीन चंद्र रॉकेट प्रक्षेपण पॅडवर

‘नासा’, या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने, आपलं नवीन शक्तिशाली चांद्र-यान प्रक्षेपकापर्यंत पोहोचवलं आहे. हे यान अंतराळवीरांना घेऊन चंद्रप्रदक्षिणा करणार आहे. ३२२ फूट लांबीचं एसएलएस, म्हणजेच स्पेस लाँच सिस्टम- रॉकेट काल फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून लाँच पॅडवर नेण्यात आलं. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे यान  चार अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल आणि १० दिवसांच्या प्रवासानंतर  परत येईल. काही तांत्रिक कारणांमुळे यानाचं प्रक्षेपण अनेक वर्ष होऊ शकलं नाही. या अभियानात अंतराळवीर चंद्र...

July 30, 2025 8:13 PM

views 15

नासासोबतच्या इस्रोच्या निसार उपग्रहाचं श्रीहरीकोटाहून यशस्वी उड्डाण

नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार - निसार  उपग्रहाचं उड्डाण आज यशस्वी झालं. आंध्रप्रदेशातल्या  श्रीहरिकोटा इथं सतीश धवन उड्डाण तळावरुन जीएसएलव्ही - एफ सिक्सटीन अग्निबाणाबरोबर संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात झेपावला आणि त्यानंतर १९ मिनिटांनी तो निर्धारित कक्षेत स्थिरावला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोने समाजमाध्यमांवर ही माहिती दिली. निसार ही अमेरिकेबरोबरची संयुक्त मोहीम असून या उपग्रहाद्वारे पृथ्वीची अधिक स्पष्ट आणि नेमकी छायाचित्रं मिळू शकतील. ही मोहीम यशस्वी झाल्य...

July 15, 2025 7:30 PM

views 19

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर पुनरागमन

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि ॲक्सियॉम फोर मोहिमेतले त्यांचे ३ सहकारी आज पृथ्वीवर सुखरुप परतले. अंतराळ स्थानकातून त्यांना घेऊन काल निघालेलं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान आज कॅलिफोर्नियात सॅन दियागोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात कोसळलं. हे अंतराळवीर आता पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता ७ दिवस पुनर्वसन कार्यक्रमात राहतील. १८ दिवसांच्या अंतराळ मुक्कामात शुक्ला यांनी भारतासाठी ७ वेगवेगळे प्रयोग केले आहेत. आकाशगंगा अशा नावाने भारतात ओळखली जाणारी ही मोहीम ॲक्सियॉम स्पेस कंपनी, नासा...

May 11, 2025 8:22 PM

views 22

नासा, इस्रो यांनी विकसित केलेला रडार उपग्रह पुढच्या महिन्यात प्रक्षेपित होणार

नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे विकसित केलेला सिंथेटिक ऍप्रोच रडार उपग्रह पुढच्या महिन्यात प्रक्षेपित केला जाण्याची शक्यता आहे.  इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी आज इंफाळमधल्या केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना ही माहिती दिली.     हा रडार उपग्रह म्हणजे एक संयुक्त पृथ्वी-निरीक्षण अभियान असून यामध्ये दोन प्रमुख पेलोड्स आणि मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे.  त्यापैकी एका पेलोडची निर्मिती भारतानं तर दुसऱ्याची अमेरिकेनं केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

March 18, 2025 8:21 PM

views 35

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीच्या दिशेने

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेनं यायला निघाले आहेत. एकूण चार अंतराळवीरांना घेऊन येणारं ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. ताशी सुमारे २७ हजार किलोमीटर वेगानं ते पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करेल.   पृथ्वीपासून १८ हजार फूट उंचीवर आल्यावर दोन ड्रॅगन पॅराशूट उघडली जातील तर सहा हजार फुटांवर मुख्य पॅराशूट उघडली जातील. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे साडे तीनच्या सुमारास अंतराळवीर समुद्रात उतरण्याची अपेक्षा आहे.    पृथ्वीवर स...

March 17, 2025 8:13 PM

views 22

NASA: सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर उद्या रात्री पृथ्वीवर परतणार

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नऊ महिन्यांहून अधिक काळ अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर उद्या रात्री पृथ्वीवर परतणार आहेत, अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिली आहे. त्यांना स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यानातून परत आणण्यात येणार आहे. त्यांच्यासह नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अॅलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील ड्रॅगन कॅप्सुलवर परतणार आहेत.

March 17, 2025 10:14 AM

views 26

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर उद्या पृथ्वीवर परतणार !

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ९ महिन्यांहून अधिक काळ अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर उद्या रात्री पृथ्वीवर परततील, अशी माहिती नासाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर, यांना आणखी एक अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यानाद्वारे भुतलावर आणण्यात येईल. अमेरिकन अवकाश संस्था नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील ड्रॅगन कॅप्सूलवर परततील. आठ दिवसाच्या अभियानासाठी गेलेल्या सुनिता वि...

February 20, 2025 1:23 PM

views 28

निसार अभियानातून नासा आणि इस्रो संपूर्ण जगाचा नकाशा तयार करतील- एस. सोमनाथ

निसार अर्थात नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार या अभियानाच्या माध्यमातून जर अंतराळविषयक मोहिमांच्या कामाचा आणि खर्चाचा वाटा विभागला तर खर्चाचं प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत पाचपटीनं कमी होईल, असं प्रतिपादन इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काल केलं. अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे आयोजित इंडिया टुमॉरो अनलॉकिंग इंडस्ट्री, इनोव्हेशन, टॅलेंट या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते.    निसार अभियानातून नासा आणि इस्रो या संस्था संपूर्ण जगाचा नकाशा तयार करतील. या नकाशातून पृथ्वीच्या परिसंस्थेतले ब...

January 30, 2025 8:14 PM

views 93

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे शुभांशु शुक्ला पहिले भारतीय ठरणार

शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ते भारतीय हवाई दलाचे अधिकारी अधिकारी असून इस्रोनं गगनयान मिशनसाठीही त्यांची निवड झाली आहे.    जूनमध्ये नासाच्या केनेडी स्पेस सेंटर इथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या यानाचे ते पायलट असतील. या मोहिमेचं नेतृत्व पेगी व्हिट्सन करणार आहेत. अंतराळ स्थानकावर उतरल्यानंतर हे अंतराळवीर १४ दिवस राहतील. अंतराळ संशोधनाविषयीचा प्रचार प्रसार, त्याची व्यावसायिक उपयोगिता हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे.