September 29, 2024 2:00 PM

views 24

अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाचं क्रू नाईन मिशन रवाना

नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं आणि स्पेस एक्स या अंतराळयान निर्मिती करणाऱ्या कंपनीने काल क्रू ९ मिशन अंतर्गत अमेरिकेच्या फ्लोरिडा इथल्या केप कॅनवरल स्पेस फोर्स स्थानकावरून एक यान अंतराळात सोडलं. यात दोन अंतराळ प्रवासी तसंच दोन रिकाम्या खुर्च्या आहेत. मागच्या एक महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना या यानातून परत आणलं जाणार आहे. हे अंतराळ यान आधी गुरुवारी सोडण्यात येणार होतं, पण हेलन या चक्रीवादळामुळे ते काल सोडण्यात आलं.     ...

August 25, 2024 8:06 PM

views 32

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर येत्या फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर परततील

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर येत्या फेब्रुवारी महिन्यात, पृथ्वीवर परततील. हे दोघं मुळात ८ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. मात्र त्यांच्या अंतराळयानात उद्भवलेल्या अनपेक्षित समस्येमुळे त्यांना जवळजवळ ८ महिने अंतराळात घालवावे लागत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे आता खास क्रू ड्रॅगॉन अंतराळ यान पाठवलं जाणार आहे. हे अंतराळ यान अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणाली आणि परतीच्या प्रवासात अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री देण्यासाठी अतिरिक्त सुविधांनी सज्ज असेल. ही ...