January 12, 2025 8:09 PM January 12, 2025 8:09 PM

views 11

तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल-प्रधानमंत्री

तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भारतातले तरुण उल्लेखनीय` परिवर्तन घडवून आणत आहेत, आपला तरुण पिढीवर विश्वास असून तरुणांकडे प्रत्येक अडचणीचं उत्तर आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले.  महत्त्वाकांक्षी  उद्दिष्टं साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक न...

January 11, 2025 1:29 PM January 11, 2025 1:29 PM

views 22

प्रधानमंत्री उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 3 हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम् इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.   विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. यावेळी तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

January 11, 2025 10:47 AM January 11, 2025 10:47 AM

views 17

दिल्लीत योगी आदित्यनाथ यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे प्रयागराज इथं संपन्न होत असलेला महाकुंभ मेळा शाश्वत अभिमानाचे प्रतीक ठरेल असं योगी यांनी भेटीनंतर लिहिलेल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यामधून नव्या भारताचे भव्य, दिव्य आणि डिजीटल स्वरुप दिसेल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रयागराज इथं १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी कालावधीत होतो आहे.  

January 11, 2025 9:31 AM January 11, 2025 9:31 AM

views 32

विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातील प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा – प्रधानमंत्री

विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातील प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा अशी आपली इच्छा आहे, सरकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी होणं गरजेचं असून ते एका अर्थानं सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचंच एक रूप आहे,असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं. आघाडीचे उद्योजक निखिल कामत यांच्या पॉडकास्टसाठी प्रधानमंत्र्यांनी ही मुलाखत दिली. एक माणूस म्हणून माझ्याकडून चुका होऊ शकतात, पण मी वाईट हेतूने कधीही चुका करणार नाही, असंही मोदी यांनी या मुलाखतीत नमूद केलं. &nbsp...

January 9, 2025 1:33 PM January 9, 2025 1:33 PM

views 12

भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे-प्रधानमंत्री

  भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ओदिशामध्ये भुवनेश्वर इथं १८ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उदघाटन करताना बोलत होते. प्रवासी भारतीय दिवस संमेलन, हा केंद्रसरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाला परस्परांच्या संपर्कात येऊन संवाद साधण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ प्रदान करतो. भारतीय समुदायाच्या पर्यटनासाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘प्रवासी भारतीय एक्स्प्रेस’ला प्रधान...

January 9, 2025 1:16 PM January 9, 2025 1:16 PM

views 14

आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

  आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.   चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या प्रति प्रधानमंत्री मोदी यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनाग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत ...

December 29, 2024 10:22 AM December 29, 2024 10:22 AM

views 11

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीतल्या निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मगुरू आणि डॉक्टर सिंग यांच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्कारापूर्वी गुरबानीचं पठण केलं. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीतल्या कॉँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात त्यांच पार्थिव शरीर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आल होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, कॉँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया ...

November 8, 2024 7:25 PM November 8, 2024 7:25 PM

views 12

महाराष्ट्राच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल – प्रधानमंत्री

विधानसभा निवडणुकांसाठीच्या  प्रचाराने वेग घेतला आहे.  भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला.  महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप त्यांनी केला.   मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या सरकारने मिळवून दिल्...

November 5, 2024 1:09 PM November 5, 2024 1:09 PM

views 14

कॅनडामध्ये फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्र्यांकडून निषेध

  कॅनडामध्ये काल ओंटारियोमधल्या ब्रॅम्प्टन इथं हिंदू मंदिरात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हल्ल्याद्वारे कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणे हा भ्याडपणा आहे.   अशा घटनांमुळे भारताचा संकल्प अजिबात ढळणार नाही. असं त्यांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आपल्या संदेशात म्हटल आहे. कॅनडा सरकारने देशात कायदा सुव्यवस्था राहील याची काळजी घ्यावी आणि या हल्ल्याबाबत योग्य कारवाई करावी अ...

November 4, 2024 1:50 PM November 4, 2024 1:50 PM

views 9

भारतातील क्षयरोग रुग्ण संख्येत 17 टक्क्यांची घट

भारताने २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत देशातील क्षयरोगाचं प्रमाण सुमारे १७ टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यासाठी देशाने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.   'क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झालेली घट हे भारताच्या समर्पित आणि अभिनव प्रयत्नांचे फलित आहे. सामूहिक भावनेच्या माध्यमातून, आपण क्षयरोगमुक्त भारतासाठी कार्य करत राहू.' असं प्रधानमंत्र्यांनी समाजमध्यमांवरील संदेशांत म्हंटलं आहे.