May 5, 2025 1:26 PM May 5, 2025 1:26 PM

views 1

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची संरक्षण सचिवांबरोबर चर्चा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली . प्रधानमंत्र्यांची काल नवी दिल्लीत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्याशी चर्चा झाली. 

April 29, 2025 3:35 PM April 29, 2025 3:35 PM

views 6

भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक- प्रधानमंत्री

शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात देशाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी, भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतासाठी शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्राला एकत्रित आणणाऱ्या युग्म संमेलनात ते बोलत होते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं हे संमेलन होत आहे.   या तिनही क्षेत्रात सरकार करत असलेल्या कामांची, आणि भविष्यातल्या योजनांची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. युग्म अर्थात - Youth, University, Government, and Mar...

April 26, 2025 3:03 PM April 26, 2025 3:03 PM

views 13

देशातले तरुण कठोर परिश्रमातून राष्ट्राची सक्षमता जगाला दाखवत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं आज मोदी यांनी नियुक्ती पत्रं वाटली, त्यानंतर ते बोलत होते.   अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट ‘मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं, देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी दे...

April 25, 2025 2:41 PM April 25, 2025 2:41 PM

views 4

प्रधानमंत्री २७ एप्रिल रोजी ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून नागरिकांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिल रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा १२१ वा भाग असेल.   नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, तसंच प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनल वरून मन-की-बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून त्यानंतर लगेचच विविध प्रादेशिक भाषांम...

April 23, 2025 8:14 PM April 23, 2025 8:14 PM

views 8

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत आणि कौस्तुभ गणवते ...

April 22, 2025 9:50 AM April 22, 2025 9:50 AM

views 9

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्री मोदी यांच्यात द्वीपक्षीय मुद्दयावर चर्चा 

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यानी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी द्वीपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला. ऊर्जा, संरक्षण, धोरणात्मक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी नोंद घेतली.   तसंच परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. प्रधानमंत्र्यांनी व्हान्स यांच्या सन्मानार्थ मेजवानीचंही आयोजन केलं होतं. जेडी व्...

April 11, 2025 1:17 PM April 11, 2025 1:17 PM

views 17

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातल्या 3 हजार ८८० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तीन हजार ८८० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते वाराणसी इथं झालं. या प्रकल्पांमध्ये वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि रस्ते जोडणी प्रकल्पांचा समावेश आहे.   वाराणसी रिंग रोड आणि सारनाथ दरम्यानचा रस्ते प्रकल्प, विद्युत क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठीचा प्रकल्प, वाराणसी विभागात जौनपूर, चंदौली आणि गाजीपूर जिल्ह्यांमध्ये एक हजार ४५ कोटी रु...

April 10, 2025 10:52 AM April 10, 2025 10:52 AM

views 2

हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट- प्रधानमंत्री

हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट असून शाश्वत जीवनशैली हा त्यावरचा उपाय आहे. जैन समाज कित्येक शतकांपासून त्याचा अवलंब करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवकार महामंत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.   नवकार महामंत्र विकसित भारताच्या संकल्पनेशी निगडीत आहे असं सांगून पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, स्वदेशी, देशांतर्गत पर्यटन, सेंद्रिय शेती, आरोग्यपूर्ण जीवनशैली, योग, खेळ आणि गरीबांची मदत- असे नवसंकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान मोद...

March 28, 2025 1:39 PM March 28, 2025 1:39 PM

views 2

प्रधानमंत्री येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक इथे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत ते सहभागी होती. थायलंडचे प्रधानमंत्री पेतोंगटार्न शिनावात्रा यांनी मोदी यांना या दौऱ्यासाठी निमंत्रित केलं आहे. प्रधानमंत्र्यांचा तिसरा थायलंड दौरा असेल.   या दौऱ्यात ते बिमस्टेक नेत्यांशी सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर मोदी हे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके यांच्या निमंत्रणावरून श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौ...

February 22, 2025 12:35 PM February 22, 2025 12:35 PM

प्रधानमंत्री’मन की बात’कार्यक्रमातून उद्या देशवासीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देश-विदेशातल्या जनतेशी आपले विचार मांडणार आहेत. दर महिन्यात प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा ११९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण प्रसारणांमध्ये, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि मोबाईल अँप वर देखील या कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहेत. मन की बात कार्यक्रमाचं आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच आकाशवाणीवरून हा क...