November 9, 2024 4:35 PM

views 10

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघात प्रचारसभा

महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना दरमहा तीन हजार रुपये मदत देणार, महिलांसाठी महिला अधिकारी आणि कर्मचारी असणारी वेगळी पोलीस ठाणी राज्यभरात उभारणार अशी आश्वासनं ठाकरे यांनी या वेळी दिली. महायुतीच्या नेत्यांना निवडणुकीच्या काळात ...

October 29, 2024 9:41 AM

views 10

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉक्टर संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

October 22, 2024 4:48 PM

views 14

नांदेड जिल्ह्यातल्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड शहर आणि परिसरात तसंच अर्धापूर, हदगाव या तालुक्यात आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातल्या सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं  आहे.

October 14, 2024 6:59 PM

views 8

नांदेडमध्ये स्वराज्य पक्षातर्फे शेतकरी आसूड मोर्चा

नांदेडमध्ये आज स्वराज्य पक्षातर्फे शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. सोयाबीनला  प्रति क्विंटल ८ हजार ५०० रुपये दर मिळावा, कापसाला ११ हजार प्रति क्विंटल, ऊसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये दर मिळावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

October 13, 2024 7:13 PM

views 20

लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

माझी लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नांदेडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातले १७ हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पोचले आहेत. असं ते म्हणाले. आचारसंहितेमुळे दोन महिन्यांचे पैसे आगाऊ दिल्याचा उल्लेख करत लाडक्या बहिणींनी साथ दिली तर या योजनेतून दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होईल अशी हमीसुद्धा ...

October 8, 2024 3:38 PM

views 13

नांदेडमध्ये १० ऑक्टोबर रोजी महिला सक्षमीकरण मेळाव्याचं आयोजन

नांदेड इथं येत्या गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी महिला सक्षमीकरण मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला आणि बालकल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याद्वारे राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

October 7, 2024 7:07 PM

views 10

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आज नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. उमेद अभियानाला ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातला शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी, त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावं, समुदाय संसाधन व्यक्तींना आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा द्यावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.  त्यासाठी ३ ऑक्टोबरपासून त्यांनी काम बंद आंदो...

October 3, 2024 3:03 PM

views 8

नांदेड जिल्ह्यात सुमारे १४ क्विंटल गांजा जप्त

नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या शिवणी बामणी, डोंगरगाव आणि दिग्रस शिवारात छापा टाकून पोलिसांनी ६७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा सुमारे १४ क्विंटल गांजा जप्त केला आहे. या भागात गांजाची लागवड अवैधपणे केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना ही कारवाई केली. या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कायद्यांअंतर्गत ७ जणांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

September 26, 2024 7:10 PM

views 18

नांदेडमध्ये ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई

नांदेडमध्ये ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. यात ५ कोटी २६ लाख रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८ ऑगस्टपासून ऑपरेशन फ्लश आऊट सुरू झालं आहे. जुगार, मटका, गुटखा विक्री, वाळू तस्करी, अंमली पदार्थांची विक्री, रेशनचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलिसांनी सहा पथकं स्थापन केली आहेत. आतापर्यंत ७५६ गुन्हे दाखल झाले असून एक हजार आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे.  

September 9, 2024 4:01 PM

views 11

नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर अनिल पाटील, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष...