January 24, 2026 5:22 PM

views 13

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त आज आणि उद्या महाराष्ट्रात नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सोहळ्याचा प्रारंभ श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने झाला. नगर कीर्तन जात असलेल्या मार्गावर नागरिकांनी रांगोळी तसंच फुलांची सजावट केली होती. देश-विदेशातून शेकडो भाविक या ऐतिहासिक समारंभात सहभागी झाले आहेत, सर्वांसाठी मोफत वाहनसेवा आणि भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. या समारंभात गुरु तेग बहादुर साहिबजींच्या बलिदानाचा वारसा जपला जात आहे. के...

December 8, 2025 3:56 PM

views 22

ड्रॅगन बोट स्पर्धेत वैष्णवी घरजाळे हिला सुवर्णपदक

नांदेड इथं नुकत्याच झालेल्या बाराव्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत लातूरमधल्या एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी घरजाळे हिने सुवर्णपदक पटकावलं.   या आधी तिने २०२२ साली थायलंडमध्ये  झालेल्या चौदाव्या एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक  मिळवलं होतं. या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

November 30, 2025 7:03 PM

views 17

नांदेड जिल्ह्यातील्या कृष्णूर एमआयडीसीतल्या कामगारांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कामगार जखमी

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात असलेल्या कृष्णूर एमआयडीसीतल्या कामगारांवर काल बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कामगार जखमी झाला. त्यानंतर या बिबट्याच्या शोधात निघालेल्या वनविभागाच्या कामगारावरही बिबट्यानं हल्ला चढवला आहे. या परिसरात बिबट्यामुळे भितीचं वातावरण असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. बिबट्याला पकडण्यासाठी सापळे, कॅमेरे आणि पिंजरेही लावण्यात आले आहेत.

October 7, 2025 3:23 PM

views 214

नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी उद्या जाहीर होणार

नांदेड  जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी उद्या ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. ही यादी संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध होणार आहे. या प्रारूप मतदार यादीबाबतच्या हरकती आणि सूचना संबंधित तहसीलदार कार्यालयात  येत्या १४ ऑक्टोबर पर्यंत सादर कराव्यात, त्यानंतर आलेल्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

September 24, 2025 3:14 PM

views 25

नांदेडमध्ये पाचशे रुपयांच्या २६७ बनावट नोटा जप्त

नांदेड शहरात मगनपुरा भागातून पाचशे रुपयांच्या २६७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. 

August 3, 2025 10:09 AM

views 18

नांदेड इथं विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा समारोप

नांदेड इथं आयोजित विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे. काल ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरूवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, यांनी यावेळी केलेल्या भाषणात, समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारी समाजनिष्ठ साहित्य निर्मिती ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.   यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भिकुजी दादा इदाते, प्राध्यापक रमेश पांडव, पूर्व संमेलन अध्यक्ष प्राध्यापक शेषराव मोरे, गोविंद नांदेडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आल...

July 11, 2025 8:14 PM

views 19

मुदखेडमध्ये  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १४८ जवानांचा दीक्षांत समारंभ

नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १४८ जवानांचा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या जवानांना विशेष पारीतोषिक देऊन गौरवण्यात आलं तसच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली. अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

June 10, 2025 3:41 PM

views 34

नांदेडमध्ये पावसामुळे फळबागांचं नुकसान

नांदेड जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करावेत, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण आणि भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या पावसामुळं झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती दिल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं तर, या नुकसानीचे तातडीनं पंचनामे केले जातील, असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.

May 20, 2025 1:30 PM

views 30

नांदेडमध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.   नांदेडमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातल्या आयटीआय मार्गावरच्या तिरंगा ध्वजापासून निघालेल्या या तिरंगा रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आली.    पंजाबमधल्या अमृतसर इथं आज भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तरुण चुग यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या आणि राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. देशाच्या एकतेचं प्रतीक म्हणून १०० फूट लांब...

April 13, 2025 6:32 PM

views 10

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे नांदेड दौऱ्यावर

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. कौठा इथं धनगर समाज बांधव आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे.