March 22, 2025 3:28 PM March 22, 2025 3:28 PM

views 7

नागपूर हिंसाचार प्रकरणी जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. इरफान अन्सारी असं या ४० वर्षीय इसमाचं नाव आहे. १७ मार्च रोजी नागपूर इथं झालेल्या हिंसाचारात अन्सारी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र आज त्यांचा मृत्यू झाला.

March 19, 2025 7:24 PM March 19, 2025 7:24 PM

views 5

नागपूर हिंसाचाराप्रकरणी ५१ जणांना २१ तारखेपर्यंत कोठडी

नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजार केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना येत्या २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.   हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात ३ पोलीस उपयुक्त, आणि ६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असं पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितलं. नागपूर शहरात ११ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आजही कलम १६३ अंतर्गत संचारबंदी लागू आहे, शहरात...

March 18, 2025 8:23 PM March 18, 2025 8:23 PM

views 5

नागपूर हिंसाचार प्रकरणी ५० जणांना अटक

नागपूर शहरात काल झालेल्या प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्याचा शोध सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. या हिंसाचारात ५ जण जखमी झाले असून त्यातल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली असून तीन पोलीस उपायुक्तांसह ३३ ते ३४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.   नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्...

March 18, 2025 3:37 PM March 18, 2025 3:37 PM

views 10

Nagpur Violence : पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

नागपुरातल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.   काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं. सर्व समुदायांचे सण-उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशा वेळी सर्वांनीच एकमेकांप्रति आदरभाव राखावा, शांतता राखावी, असं आवाहनही फडणवीसांनी केलं. नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू प...