October 7, 2024 3:38 PM October 7, 2024 3:38 PM

views 15

मुंबईतल्या माहीम इथं रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग

मुंबईत माहीम इथं मोहित हाइट्स या रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काल भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीतील काही रहिवासी अडकले होते, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढलं. आगीत घरातलं सामानसुमान जळून खाक झालं. आगीचं कारण समजू शकलं नाही.

October 6, 2024 3:53 PM October 6, 2024 3:53 PM

views 19

मुंबईतल्या चेंबूर इथं लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू

मुंबईत चेंबूर इथं सिद्धार्थ कॉलनी परिसरात आज पहाटे एका दुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीररीत्या होरपळले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर विजेच्या तारांजवळ शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचं अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी सांगितलं.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य तसेच दोन जखमींच्या उपचाराचा खर्च ...

October 1, 2024 3:55 PM October 1, 2024 3:55 PM

views 11

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातल्या भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतले भाजपचे मंत्री, आमदार, खासदार भाग घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं समजतं.

September 28, 2024 1:33 PM September 28, 2024 1:33 PM

views 40

मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या इशाऱ्यानंतर शहरात हाय अलर्ट जारी

मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळाल्यावर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. आगामी नवरात्रौत्सव लक्षात घेऊन मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा त्यात समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं भाविकांसाठी नियम जाहीर केले आहेत. 

September 26, 2024 3:18 PM September 26, 2024 3:18 PM

views 11

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान

मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे.   राज्यात गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी तर ३ जण बेपत्ता आहेत. मुंबईत अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश म...

September 11, 2024 7:29 PM September 11, 2024 7:29 PM

views 12

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची नियुक्ती केली आहे.  या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेत आज सामंजस्‍य करार करण्‍यात आला. पालिका आयुक्‍त भूषण गगराणी, अतिरिक्‍त आयुक्‍त अभिजीत बांगर यांच्‍या उपस्थितीत या करारावर स्‍वाक्ष-या केल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली.

August 9, 2024 7:28 PM August 9, 2024 7:28 PM

views 14

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८२० अंकांनी वधारला

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होतांना ८२० अंकांनी वधारून ७९ हजार ७०६ अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही २५० अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३६७ अंकांवर पोहोचला.

August 4, 2024 1:46 PM August 4, 2024 1:46 PM

views 13

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता

भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य राजस्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या महिन्याच्या १० तारखेपर्यंत जम्मू-काश्मीर आणि पंजाब, तसंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातह...

August 3, 2024 7:38 PM August 3, 2024 7:38 PM

views 18

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. वरळी इथल्या पोलीस वसाहतीच्या समस्याही तत्काळ दूर करण्यासाठी आठ दिवसांच्या आत कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली. बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतीत दुकानदारांना वाढीव जागा कशी दे...

August 3, 2024 1:22 PM August 3, 2024 1:22 PM

views 15

मुंबई मध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. उपनगरी रेल्वे गाड्या नियमित वेळेत धावत आहेत.   मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागानं आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.   दरम्यान, हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.