November 9, 2024 5:14 PM November 9, 2024 5:14 PM

views 18

घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर पथनाट्य सादर करुन नागरिकांना मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन

विधानसभा निवडणूकीच्या निमित्तानं स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आज पथनाट्य सादर करुन नागरिकांना त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन करण्यात आलं.   स्वीप उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाबाबत सामुहिक प्रतिज्ञा केली. महापालिकेच्या मुख्यालयातल्या ज्ञानकेंद्रात झालेल्या या शपथ ग्रहण सोहळ्याला महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदेही उपस्थित होते.

October 29, 2024 1:47 PM October 29, 2024 1:47 PM

views 14

भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी – मंत्री नितीन गडकरी

भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. मुंबई इथं भारत-स्पेन सीईओ फोरमला ते आज संबोधित करत होते, यावेळी स्पेनचे राष्ट्राध्यक्ष एच ई  पेद्रो सँचेज उपस्थित होते. दळणवळ, पायाभूत सुविधा आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांची भागीदारी असं गडकरी म्हणाले. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देईल, अशा आर्थिक संबंधांना बळकटी देण्यासाठी हा संवाद मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

October 28, 2024 10:07 AM October 28, 2024 10:07 AM

views 13

मुंबईतील निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध

दिवाळी सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेत मध्य आणि पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई विभागातील निवडक प्रमुख स्थानकांवरफलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटलं आहे. फलाट तिकिटांच्या विक्रीवरील हे निर्बंध 8 नोव्हेंबर पर्यंत लागू आहेत.

October 28, 2024 8:47 AM October 28, 2024 8:47 AM

views 7

मुंबईत वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीत ९ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबईत वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली, यात नऊ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस, इथल्या फलाट क्रमांक एक वर वांद्रे-गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांचा या गर्दीत समावेश होता.   दरम्यान, दिवाळीनिमित होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह रेल्वेच्या काही प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर...

October 18, 2024 8:46 AM October 18, 2024 8:46 AM

views 9

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर तर मुलींमधून मुंबईच्या संघाला विजेतेपद

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघानं तर मुलींच्या गटात मुंबई संघानं विजेतेपद पटकावलं आहे. यजमान लातूर विभागाच्या दोन्ही संघास उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.  

October 17, 2024 7:49 PM October 17, 2024 7:49 PM

views 16

मुंबईत १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या  जलवाहिनीच्या यंत्रणेत  बिघाड झाल्यामुळे आज १७ आणि उद्या १८ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व ठिकाणी  ५ ते १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.  जलवाहिनीच्या यंत्रणेचं  दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु असून, या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे.

October 16, 2024 7:26 PM October 16, 2024 7:26 PM

views 12

मतदान केंद्रांची माहिती मिळण्यासाठी मुंबईतल्या मतदारांना घरपोच पत्र

मतदान केंद्रांची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी मुंबईतल्या मतदारांना घरपोच पत्र दिली जात आहेत. त्यात दिलेला QR कोड स्कॅन केला की मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा नकाशा मिळेल, अशी माहिती मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मुंबईतल्या काही मतदान केंद्रांमध्ये लागलेल्या रांगा आणि मतदारांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याची, तसंच एका मतदान केंद्राच्या ठिकाणी १० पेक्षा जास्त केंद्रं असल्यास ही कें...

October 16, 2024 3:17 PM October 16, 2024 3:17 PM

views 60

मुंबईच्या ओशिवरा भागात इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू

मुंबईच्या ओशिवरा भागात आज एका इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वृद्ध दांपत्याचा आणि त्यांच्या मदतनीसाचा समावेश आहे. ओशिवरा इथल्या रिया पॅलेस या इमारतीत दहाव्या मजल्यावर सकाळी साडे आठच्या सुमाराला आग लागली. या आगीच्या धुरामुळे चंद्रप्रकाश सोनी, ममता सोनी आणि त्यांचा मदतनीस पेलू बेटा यांचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

October 9, 2024 3:32 PM October 9, 2024 3:32 PM

views 12

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य राहणे असेल मुंबई संघाचा कर्णधार

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीचा मुंबई संघ जाहीर झाला असून, इराणी चषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटू तनुष कोटियन याला मुंबई संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. २०२४-२५ च्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांसाठी १६ सदस्यीय मुंबई संघातून तनुष आपलं कसब दाखवेल. स्पर्धेच्या ‘एलिट ग्रुप ए’ चा सामना येत्या शुक्रवारी बडोद्यातल्या कोटांबी क्रीडांगणावर होत असून मुंबई संघाची लढत बडोदा संघाशी होईल. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे आहे.

October 9, 2024 3:03 PM October 9, 2024 3:03 PM

views 8

वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा – मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई महानगर क्षेत्रातलं वायू प्रदूषण रोखणं आणि धूळ नियंत्रित करणं यासाठी मार्गदर्शक तत्‍त्‍वं जारी करण्‍यात आली आहेत, त्‍याची प्रभावीपणे अंंमलबजावणी करावी आणि प्रसंगी दंडात्‍मक कारवाई करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची पूर्तता करण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली असून त्याची बैठक काल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली.  प्रत्‍यक्ष कार्यक्षेत्रस्‍थळी कार्यरत अधिकारी - कर्मचारी, पोलिस अंमलदारा...