August 27, 2025 3:44 PM August 27, 2025 3:44 PM

views 17

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईसाठी रवाना

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे निघाला. यात मराठवड्यातील हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. आपल्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं मनोज जरांगे यांनी वार्ताहरांना सांगितलं.   चर्चेसाठी आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली, मात्र चर्चा सर्वांसमोर करण्याची अट त्यांनी ठेवली आहे. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज क...

August 12, 2025 7:24 PM August 12, 2025 7:24 PM

views 11

१८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं मुंबईत उद्घाटन

भारतात परंपरा आणि नवोन्मेष, आध्यात्मिकता आणि विज्ञान, औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत झालं. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधित करत होते. भारतीय अनेक शतकांपासून अवकाशाचं निरीक्षण करत आले आहेत.   पाचव्या शतकात आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला, पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरते हे त्यांनीच सांगितलं, याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आवर्जून केला. व...

August 5, 2025 5:11 PM August 5, 2025 5:11 PM

views 40

पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत, कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा – मुख्यमंत्री

कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मुंबई महापालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांची उपासमार होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

July 20, 2025 6:50 PM July 20, 2025 6:50 PM

views 23

मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात आज जनता दरबाराचं आयोजन केलं गेलं. यावेळी गोयल यांनी नागरिकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी नागरिकांनी महानगरपालिका, गृहनिर्माण संस्था, पोलीस विभागांशी संबंधित आपल्या तक्रारी मांडल्या. तातडीनं या समस्या सोडवाव्यात असे निर्देश गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना  यावेळी दिले.

July 18, 2025 8:13 PM July 18, 2025 8:13 PM

views 8

मुंबईत ५६व्या ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीची बैठक

गोव्यात होणारा ५६व्या ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीची पहिली बैठक आज मुंबईत झाली. बैठकीच्या अध्यक्षपदी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव होते. सुकाणू समितीचा विस्तार करण्यात आला असून  सदस्यांची संख्या 16 वरून 31 करण्यात आली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.

July 18, 2025 7:17 PM July 18, 2025 7:17 PM

views 9

मुंबईला कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुढची हजारो वर्षे कुणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी सभागृहात आरोप करताना नीट पुरावे द्यावेत, सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा, मात्र चर्चेत कोणतेही पुरावे न देता नुसतेच आरोप करण्यात आले, असं ते म्हणाले.   विधिमंडळ परिसरात झालेल्या मारामारीच्या घटनेमुळे आपल्याला वेदना झ...

July 8, 2025 3:29 PM July 8, 2025 3:29 PM

views 12

मुंबईतल्या शासकीय जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई उपनगरातल्या शासकीय जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली. आमदार योगेश सागर यांनी या भागातल्या अतिक्रमणाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.   मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, तसंच मुंबईच्या जिल्हाधिकारी यांचा या समितीत समावेश असेल.    अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी...

July 7, 2025 2:29 PM July 7, 2025 2:29 PM

views 15

CSMI विमानतळावर जप्तीच्या प्रकरणात चौघांना अटक

मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्तीच्या तीन मोठ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली. जप्तीमध्ये गांजा, तस्करी केलेले जीवंत आणि मृत वन्यजीव, आणि सोने यांचा समावेश असून, याची एकत्रित किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे नऊ किलो गांजा, तर दुसऱ्या प्रवाशाकडून तीन प्रजातींचे ३० जीवंत तर १४ मृत वन्यजीवांचे नमुने आढळले. तर तिसऱ्या घटनेत दुबईहून येणाऱ्या दोन प्रवाशांकडून सुमारे दीड किलो सोनं जप्त ...

June 27, 2025 10:00 AM June 27, 2025 10:00 AM

views 5

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आत्तापर्यंत 23 टक्के पेरण्या पूर्ण

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आत्तापर्यंत 23 टक्के म्हणजे 33 लाख 59 हजार 81 हेक्टर जमिनीवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 19 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. सोयाबीनचं राज्यातलं सरासरी क्षेत्र 47 लाख 21 हजार 488 हेक्टर आहे. त्यापैकी 11 लाख 54 हजार 461 हेक्टरवर म्हणजे 24 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.   कपाशीची 27 टक्के क्षेत्रा...

June 23, 2025 8:39 PM June 23, 2025 8:39 PM

views 22

अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळते – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

सरकारची धोरणं, योजना आणि कृतींवर अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. ते आज मुंबईत राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्ताने विधान भवनात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनावेळी बोलत होते. अंदाज समित्या या आर्थिक वाटप आणि अर्थसंकल्पीय खर्चाचं पारदर्शकतेने निरीक्षण करतात, असंही बिरला यावेळी म्हणाले. यावेळी बिरला यांच्या हस्ते वर्धापन दिन स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. अर्थसंकल्...