July 27, 2024 10:54 AM July 27, 2024 10:54 AM

views 19

मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी दक्षतेचा पिवळा बावटा दाखवला आहे. मुंबईमध्ये काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागानं मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील पिवळा बावटा तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी नारंगी बावटा जारी केला आहे.

July 25, 2024 7:22 PM July 25, 2024 7:22 PM

views 11

मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे, प्रशासनाचा निर्णय

जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये ६६ टक्क्यापेक्षा जास्त भर पडली आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईत सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात येत्या २९ जुलै पासून मागे घेण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे.

July 14, 2024 7:15 PM July 14, 2024 7:15 PM

views 13

मुंबईसह कोकणात पावसाची संततधार

राज्यात आजही अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई ठाण्यासह उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.  मुंबईत दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळं पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली, मात्र ती लगेचच पूर्ववत झाली. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आल्याची स्थिती आहे. भिवंडीत बाजारपेठ, तीन बत्ती, कल्याण नाका या परिसरात गुडघाभर पाणी साचलं. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झालं. जिल्ह्या...

July 8, 2024 6:43 PM July 8, 2024 6:43 PM

views 16

मुंबईत गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला सर्वाधिक पाऊस

मुंबई महानगर क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली. सांताक्रुझ वेधशाळेत नोंद झालेला गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार आज सकाळी साडे ८ पर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात २६७ मिलिमीटर पाऊस झाला. यापूर्वी २ जुलै २०१९ रोजी ३७५ आणि १५ जुलै २००९ रोजी २७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी मध्यरात्री १ ते सकाळी ७ दरम्यान सुम...

July 8, 2024 1:36 PM July 8, 2024 1:36 PM

views 16

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.   मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात काल सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात र...

July 5, 2024 7:31 PM July 5, 2024 7:31 PM

views 14

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा विधानभवनात सत्कार

टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला राज्य सरकारनं ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली.     आजच्या सत्कारमूर्तींमध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसंच सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा समावेश होता. गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांनी केल...

June 16, 2024 7:55 PM June 16, 2024 7:55 PM

views 30

१८व्या मिफ चित्रपट महोत्सवात डॉक फिल्म बझारचं उद्घाटन

१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या डॉक फिल्म बझारचं उद्घाटन आज झालं.   दिल्ली क्राइम या गाजलेल्या वेबसीरीजच्या निर्मात्या आणि एमी पुरस्कार विजेत्या अपूर्वा बक्षी यांनी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रांगणात मिफच्या डॉक फिल्म बझार या माहितीपट प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स-शर्मा यावेळी उपस्थित होत्या.   नवोदित माहि...

June 13, 2024 7:37 PM June 13, 2024 7:37 PM

views 11

१८ व्या ‘मिफ’ महोत्सवात २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.   आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्त्रसूर्य सावरकर, डोमकावळा - द रावन, भेड चाल, म्हातारा डोंगर हे लघुपट-माहितीपट पाहता येतील...