October 15, 2025 10:35 AM October 15, 2025 10:35 AM

views 21

मुंबई मेट्रो मार्फत मोफत वाय-फाय सुविधा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मुंबई मेट्रो मार्ग-तीनच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि MetroConnect3 मोबाईल अ‍ॅपद्वारे डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे. ही वाय-फाय सुविधा अ‍ॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर उपलब्ध आहे.   ही वाय-फाय सेवा मोफत, सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे, यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी तिकीट घेण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आलं आहे.

October 9, 2025 2:53 PM October 9, 2025 2:53 PM

views 36

मुंबई मेट्रो ३चा अखेरचा टप्पा प्रवाशांसाठी खुला

मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे. आज सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी जाणारी आणि येणारी पहिली मेट्रो आरे आणि कफ परेड अशा दोन्ही स्थानकांतून रवाना झाली. तर रात्री साडे दहा वाजता शेवटची मेट्रो असेल. यामुळं मंत्रालय, विधानभवन, कफ परेड सारख्या भागात थेट मेट्रोनं जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानं काही ठिकाणी सकाळी नागरिकांनी प्रवासासाठी गर्दी केली होती. सीएसएमटी स्थानकालगतच्या सबवेमधून थेट मेट्रोच्या स्थानकात प्रवेश करण्याची सोय या...

October 8, 2025 7:29 PM October 8, 2025 7:29 PM

views 137

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, आणि मुंबई १ ॲपचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकिट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयटीआयमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला.   ८ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं. डिसे...

May 9, 2025 3:40 PM May 9, 2025 3:40 PM

views 12

मुंबई मेट्रो मार्ग ३च्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक सेवेचा शुभारंभ

मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी ते वरळीमध्ये आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या ९ किलोमीटरच्या पल्ल्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. या मार्गिकेचं काम अतिशय वेगानं झालं असून आचार्य अत्रे चौकापासून कफ परेडपर्यंतचा टप्पा यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करून जनतेसाठी खुला करण्याचं सरकारचं ध्येय असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना दिली. ही मार्गिका अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार असल्याचं ते म्हणाले. आत्तापर्यंत सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकांना चांगला प्रत...

October 15, 2024 7:16 PM October 15, 2024 7:16 PM

views 13

मंबई मेट्रो-३वरून विमानतळावर जाण्यासाठी मोफत बससेवा

मुंबई मेट्रो-३ सेवेच्या टी-2 स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने मुंबई मेट्रो प्राधिकरणाने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. या बसमध्ये प्रवाशांना त्यांच्या सामानासाठी लोडर सुविधाही उपलब्ध असेल.