June 9, 2025 3:33 PM June 9, 2025 3:33 PM

views 16

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान उपनगरी रेल्वेगाडीतून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू, ९ जखमी

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाडीतून दारात लटकून जाणारे प्रवासी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांना धडकल्याने हा अपघात झाला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. भविष्यात असे अपघात होऊ नयेत, याकरता सर्व गाड्या १५ डब्यांच्या करणं, स्वयंचलित दरवाजे बसवणं अशा उपाययोजना करण्यात येतील, असं त्...