August 27, 2025 5:31 PM

views 12

प्रधानमंत्री उद्यापासून जपान आणि चीन दौरा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जपान आणि चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ते जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्याबरोबर १५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल माध्यमांना दिली.   चीनमध्ये, प्रधानमंत्री ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या पंचविसाव्या बैठकीत सहभागी होतील.

August 3, 2025 10:20 AM

views 21

व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं प्रधानमंत्री यांच आवाहन

व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल वाराणसी इथं, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जारी करण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते, २०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरु केल्यानंतर विरोधी पक्षांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र, सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण पावणे चार लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा...

July 12, 2025 8:25 PM

views 16

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या रोजगार मेळाव्यातून ५१ हजार युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

युवकांचं सक्षमीकरण आणि विकसित भारतात त्यांचं योगदान वाढवण्यासाठी रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला ते संबोधित करत होते. त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विविध सरकारी विभागांत नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. या उपक्रमामुळे लाखो तरुणांना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि ...

July 4, 2025 9:54 AM

views 17

पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये शानदार स्वागत

भारत हा जगभरातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. तत्पुर्वी विमानतळावर त्यांचे शानदार स्वागत करण्यात आलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा असून आपले पुर्वज भारतीय संस्कृतीचे वाहक आहेत असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा आहे आणि 1999 नंतरचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. आपल्या ...

June 27, 2025 11:15 AM

views 31

प्रधानमंत्र्यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे देशातलं उत्पादन वाढलं आहे-राज्यमंत्री व्ही.सोमन्ना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे, देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली असून, मेक इन इंडिया उपक्रमामुळं देशात उत्पादन वाढलं आहे, असं प्रतिपादन रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही.सोमन्ना यांनी काल चेन्नईतील पेरांबूर इथं इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात केलं. आयसीएफ दरवर्षी 50 वंदे भारत गाड्यांचे उत्पादन करेल. गेल्या वर्षी या कारखान्यात 3700 डबे तयार करण्यात आले होते आणि यावर्षी 4200 डबे तयार करण्याचं उद्दिष्ट आहे, असंही...

June 2, 2025 8:14 PM

views 31

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठक, संयुक्त आयोगाच्या स्थापनेसाठी उभय देशांमधे सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत व्यापार, संरक्षण, आरोग्य, रेल्वे, अंतराळ, कृषी, स्वच्छ ऊर्जा, हायड्रोजन आणि जैव इंधन या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि पॅराग्वे यांनी संयुंक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय संघटनांमध्ये समान हिताच्या मुद्द्यांवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देश डिजिटलीकरण आणि माहितीआधारीत संवाद तंत्रज्ञान वाढवण्यावर काम करत आहेत.   यावेळी भारत आणि पॅराग्वे ...

February 1, 2025 7:57 PM

views 24

देशातल्या नागरिकांना विकासाचे भागीदार बनवण्याचा पाया घालणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रशस्ती, तर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १४० कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब दिसतं अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. देशातले नागरिक विकासाचे भागीदार बनतील, याचा पाया या अर्थसंकल्पानं घातला आहे, रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्राला प्राथमिकता दिली गेली आहे, असं ते म्हणाले. यामुळे गुंतवणूक, बचत वाढीला लागेल तसंच देशाच्या प्रगतीला वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पामुळे कृषी क्षेत्राचं सक्षमीकरण होईल, ग्राम...

September 22, 2024 1:49 PM

views 21

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या घेतल्या भेटी

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांनी बायडेन यांच्या डेलावेर इथल्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतल्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या नव नव्या संधींवर चर्चा केली. ही चर्चा अत्यंत फलदायी ठरल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून सांगितलं. जपानचे प्रधानमंत्री फुमियो कीशीदा आणि ऑस्ट्रेलियाचे ...

September 17, 2024 11:14 AM

views 21

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि निर्णय घेण्यात आले आहेत, आणि विकसीत Bharat@2047 यांचा भक्कम पायाभरणी केली आहे.  

September 1, 2024 1:24 PM

views 9

उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारत हा जागतिक दृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्याना आवश्यक सुविधा, स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत इकनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम मध्ये बोलत होते. आगामी काळात गुंतवणूकदारांनी नवोन्मेष, उत्तम कामगिरी, सकारात्मक पर्यायांना पसंती आणि दर्जेदार उत्पादनांचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावर्षी जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्य...