November 6, 2024 3:12 PM

views 28

आपलं सरकार फुकट गोष्टी देण्याऐवजी महिलांना सक्षम करेल – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळच्या राळेगाव इथल्या सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी लाडकी बहीण योजनेवरुनही त्यांनी टीका केली. आपलं सरकार असल्या फुकट गोष्टी देण्याऐवजी महिलांना सक्षम करेल आणि त्यांच्या हाताला काम देईल असाही विश्वास त्यांनी दिला. विकासाची ब्लु प्रिंट मांडणारा पहिला पक्ष मनसे आहे असंही त्यांनी सांगितले.

November 5, 2024 2:36 PM

views 31

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात प्रचार दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राळेगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राळेगाव इथं चार वाजता मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मनसेचे वणी इथले उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची शासकीय मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

October 25, 2024 7:19 PM

views 22

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची चौथी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात कसबा पेठेतून गणेश भोकरे, चिखलीतून गणेश बरबडे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अभिजीत राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय केजमधून रमेश गालफाडे आणि कलीना इथून संदीप हुटगी निवडणुकीच्या रिंगणात असतील.

October 21, 2024 7:14 PM

views 17

विधानसभा निवडणुकांसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. डोंबिवलीत राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

August 24, 2024 8:10 PM

views 23

विधानसभा निवडणुकीत मनसे २५० जागा  लढवणार

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५० जागा  लढवणार असल्याचं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. नागपुरातील रवि भवन इथं  आज, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जनता आपल्यासोबत असून मनसेला निवडणुकीत चांगले यश मिळेल असा दावा ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठीची आपली धोरणं त्यांनी स्पष्ट केली. राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना औटघटकेची ठरेल. राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याने ही योजना 2 महिन्यात गुंडाळली जाईल असं भाकित त्यांनी वर्तवलं.

July 25, 2024 3:24 PM

views 17

विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार – राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २२५ ते २५० जागा लढवणार असून त्यादृष्टीनं येत्या १ ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली.