January 5, 2026 8:15 PM

views 35

महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेची न्यायालयात धाव

महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुकांमध्ये ६८ ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुकीला स्थगिती द्यावी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या अर्ज माघारीची न्यायालयीन चौकशी करावी असं मनसेनं या याचिकेत म्हटलं आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे.

January 2, 2026 7:41 PM

views 120

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूचा वचननामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दादर इथं शिवसेना भवनात मुंबईतल्या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या. यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी, मनपा शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयं, सुरक्षित पार्किंग, स्वयंरोजगार, कर प्रणाली, मोफत पाणी-वीज, १० रुपयांत जेवण, तरुणांसाठी सहाय्यता निधी, बेस्ट भाडे आदी सर्व समा...

December 26, 2025 5:26 PM

views 668

मनसेला धक्का! प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले प्रकाश महाजन यांनी आज ठाण्यातत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपण पद किंवा उमेदवारीसाठी कोणतीही मागणी न करता शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं महाजन यांनी बातमीदाराशी बोलताना सांगितलं. ते शिवसेनेचे प्रवक्ते असतील, असं शिंदे यांनी सांगितलं.

August 12, 2025 3:38 PM

views 20

मनसेच्या प्रतिनिधी मंडळाची निवडणूक आयोगाला भेट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. प्रभाग पद्धत नको, एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवावी तसंच मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅटचा वापर करावा, अशी मागणी त्यांनी केली.  पालिका निवडणुकीआधी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम तातडीने राबवण्याची मागणी आपण  निवडणूक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं मनसे नेते  बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

July 8, 2025 3:04 PM

views 29

कायदा सुव्यवस्थेसाठी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर इथं हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकत होता म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.    दरम्यान...

May 14, 2025 7:49 PM

views 24

मनसेच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर जाण्याच्या प्रस्तावाला आपल्या पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद असून भविष्यातही राहील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. नाशिक इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्यासाठी महाराष्ट्रद्रोह करणाऱ्यांशी संबंध ठेवू नये एवढीच अट राहील असं सांगून ते म्हणाले, की राज ठाकरे यांच्यासाठी आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत.   राज्यातल्या महानगरपालिका...

March 23, 2025 7:49 PM

views 113

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. अमित ठाकरे यांच्यावर सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. हे पक्षांतर्गत बदल येत्या दोन महिन्यात पूर्ण राज्यात लागू केले जातील असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

February 21, 2025 7:28 PM

views 25

राज ठाकरेंनी घेतली मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत दोन विषयांवर चर्चा झाल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर माध्यमांना दिली. सध्या मुंबई महानगरपालिका तोट्यात असून तोटा कमी करण्यासाठी मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या विविध कंपन्यांच्या केबल्सवर कर आकारणी करावी, याबाबत आयुक्तांशी चर्चा झाल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.    तसंच, मुंबईत पालिका रुग्णालयांवर दुसऱ्या शहर किंवा परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्याचा आर्...

November 10, 2024 6:17 PM

views 22

महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी हाती सत्ता द्या, राज ठाकरेंचं आवाहन

पुणे शहरातही आज विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. मला खुर्चीचा किंवा सत्तेचा सोस नाही, तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचंय, म्हणून माझ्या हाती एकदा सत्ता द्या, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज पुण्यात आयोजित प्रचार सभेत बोलत होते.    गेल्या पाच वर्षातलं राजकारण आणि नेतेमंडळींचे वागणं किळसवाणं आहे. हे असंच चालू राहिलं, तर येत्या काळात महाराष्ट्राचं आणखी वाटोळं होईल, अशी टीका त्यांनी केली.

November 8, 2024 7:10 PM

views 28

कोकणात बदल हवा असेल, तर मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा – राज ठाकरे

'कोकणात बदल हवा असेल, तर आतापर्यंत ज्यांना मतदान करत आला आहात त्यांना नाकारा आणि मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. ते आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथल्या पाट-पन्हाळे इथं प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मनसेचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.