May 31, 2025 8:07 PM May 31, 2025 8:07 PM
3
मिझोराममध्ये भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू
मिझोराममध्ये गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत किमान ५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. चंफाई जिल्ह्यात म्यानमार सीमारेषेजवळ झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातल्या २ महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामपरिषदेच्या अध्यक्षांनी आकाशवाणी प्रतिनिधीला दिली. सेरछिप जिल्ह्यात भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाला तर अनेक इमारतींची पडझड झाली. सेरछिप-ऐझवाल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद करण्यात आला आहे...