September 22, 2024 11:01 AM

views 19

भारत 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून देशाचा विकास दर सात टक्क्यांच्या आसपास राहील – उद्योग मंत्री पियूष गोयल

भारत 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून देशाचा विकास दर सात टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल सांगितलं. लाओस इथं आयोजित 12 व्या पूर्व आशियाई देशांच्या अर्थमंत्र्यांच्या शिखर परिषदेत ते बोलत होते. पूर्व आशिया समिट फोरम बळकट करण्यास भारत वचनबद्ध असल्याचा गोयल यांनी पुनरुच्चार केला तसंच या मंचानं शांतता, स्थैर्य आणि आर्थिक भरभराटीला चालना देण्यात बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली. जागतिक व्यापार ...

September 13, 2024 7:17 PM

views 7

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलचं पीयूष गोयल यांच्या हस्ते अनावरण

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलच अनावरण पीयूष गोयल यांनी आज मुंबईत केलं. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांना याद्वारे प्रशासनासोबत थेट आणि पारदर्शकरित्या संवाद साधता येणार आहे. चहा, कॉफी, मसाले, रबर महामंडळ, अपेडा, परदेश व्यापार महासंचलनालय यांच्यासारख्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विभागांचा यात समावेश आहे. ECGC च्या सुधारित SMILE-ERP सुविधेचं लोकार्पणही त्यांनी केलं. जनसुनवाणी पोर्टलच्या माध्यमातून निर्यातदारांना त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येणार आहेत. व्यापार मंड...

September 6, 2024 8:10 PM

views 17

भूमध्यसागरीय देशांमध्ये उत्पादित वस्तूंसाठी भारत मोठी बाजारपेठ – मंत्री पीयूष गोयल

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमधले व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन  वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. ते नवी  दिल्लीत भारत-भूमध्य व्यापार परिषदेत बोलत होते. भूमध्यसागरीय देशांमध्ये उत्पादित वस्तूंसाठी भारत ही मोठी  बाजारपेठ असल्याचं ते म्हणाले. जागतिक व्‍यापारासाठी मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी  भूमध्यसागरीय देशांचे  आभार मानले.  भारतीय बंदरांचा वेगानं विकास करण्याचं काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.