February 9, 2025 7:01 PM

views 36

मनोहर भाई पटेल यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी-पीयूष गोयल

शिक्षण महर्षी  मनोहर भाई पटेल यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त आज गोंदिया भंडारा जिल्ह्यातले  गुणवंत विद्यार्थी, शेतकरी आणि पत्रकारांचा केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते गोंदिया इथं सत्कार करण्यात आला. मनोहर भाई पटेल यांनी आदिवासीबहुल भागात शिक्षणाचा निरंतर प्रसार केला. त्यांचं हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं पीयूष गोयल यावेळी म्हणाले.  

January 27, 2025 1:21 PM

views 17

मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

११ व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भेटीदरम्यान गोयल ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद बिन मुसा अल युसेफ यांच्याशी चर्चा करतील. उभय देशांचे मंत्री व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर चर्चा करतील. या भेटीमुळे ओमानसमवेत व्यापार आणि गुंतवणूक संबंधांबद्दल देशाची वचनबद्घता अधोरेखित होणार असून उभय देशांतील संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय...

January 15, 2025 8:43 PM

views 23

आपत्कालीन परिस्थितीत भारताचा नेहमीच मदतीचा हात – मंत्री पियुष गोयल

शेजारी राष्ट्रांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर भारतानं नेहमीच मदतीचा हात सर्वप्रथम पुढे केला आहे,असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित वर्ल्ड काँग्रेस ऑन डिझायस्टर मॅनॅजमेण्ट या परिषदेत ते बोलत होते. बचाव आणि मदत कार्यामध्ये सशस्त्र सेनेचं योगदान या विषयावर बोलताना त्यांनी पायदळ, नौदल, हवाईदल तसंच केंद्रीय आणि राज्य शीघ्र कृती दलानं केलेल्या त्यागाचं कौतुक केलं. कोविड  काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून १०० हुन अधिक  देशांना दिलेल्या मोफत ल...

January 9, 2025 8:12 PM

views 22

‘सेंद्रिय शेती’ अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम – मंत्री पियुष गोयल

सेंद्रिय शेती हे अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या ८ व्या भागाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. सध्या देशाच्या सेंद्रिय उत्पादनांची  निर्यात सहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली असून येत्या तीन वर्षांमध्ये हा आकडा २० हजार कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले. 

January 4, 2025 8:40 PM

views 22

उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याच्या दृष्टीनं वेगानं काम सुरू-पियुष गोयल

'उत्तर मुंबई'ला 'उत्तम मुंबई' करण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं वेगानं काम सुरू असल्याची ग्वाही पियुष गोयल यांनी आज दिली. उत्तर मुंबईतल्या नागरी सेवांबाबत मुंबई महानगरपालिकेत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर मुंबई आणि संबंधित भागातल्या एकंदर ६० हजार कोटी रुपये मूल्यांच्या नागरी सुविधांवर बैठकीत चर्चा झाल्याचं आणि विविध कामं पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा ठरवल्याचं गोयल यांनी सांगितलं.

January 3, 2025 8:15 PM

views 19

‘भारत’ जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश – मंत्री पियुष गोयल

११० हुन अधिक युनिकॉर्न स्टार्टअप असलेला भारत देश जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल  आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना म्हणाले. देशभरातल्या स्टार्टअप पैकी ४३ टक्के स्टार्टअप महिलांनी सुरु केले असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली.  जगभरात भू राजकीय  ताणतणाव असूनही भारताची वाढती निर्यात लवकरच ८०० बिलियन डॉलर्स इतक्या मूल्याचा टप्पा गाठेल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. 

December 9, 2024 1:39 PM

views 18

नॉर्वे आणि भारत यांच्यात स्टार्टअप पूल सुरू करण्याचा मंत्री पियुष गोयल यांचा प्रस्ताव

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नॉर्वे आणि भारत यांच्यादरम्यान स्टार्टअप पूल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. उभय देशांच्या व्यापार संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं गोयल यांनी सांगितलं. भारतीय उद्योग महासंघ, अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या सहकार्यानं मुंबईत आयोजित भारत-नॉर्वे व्यावसायिक चर्चेला संबोधित करताना गोयल बोलत होते. नुकताच भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना  यांच्यात नुकताच व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार करण्यात आला. त्यात युरोपियन महासं...

November 28, 2024 1:03 PM

views 36

चौफेर प्रगतीमुळे भारत जागतिक पातळीवर आकर्षण ठरला असल्याचं मंत्री गोयल यांचं प्रतिपादन

सर्वच क्षेत्रातल्या चौफेर प्रगतीमुळे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार, संशोधन आणि गुंतवणुकीसाठी जागतिक पातळीवर आकर्षण ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. डिजिटल भारत अभियानामुळे देशात क्रांती घडली असून भारत विदा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तत्संबंधी संशोधनाचं केंद्र बनला आहे असं ते म्हणाले.   अमेरिका आणि युकेमधल्या घडामोडींचा परिणाम भारताच्या ता देशांबरोबरच्या व्यापारी संबंधांवर होणार नाही असं सांगून ते म्ण...

November 28, 2024 11:22 AM

views 26

फ्रान्स आणि आशिया-पॅसिफिक भागीदार देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्याचं मंत्री गोयल यांचं आवाहन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी फ्रान्स आणि आशिया-पॅसिफिक भागीदार देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्याचं आवाहन केलं आहे. ते काल नवी दिल्लीत, आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठीच्या, फ्रेंच विदेशी व्यापार आयुक्तांच्या वार्षिक परिषदेत बोलत होते. यामध्ये द्विपक्षीय करार आणि बहुपक्षीय मंचांद्वारे व्यापार संबंध वाढवणे, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तांत्रिक सहकार्य मजबूत करणे आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण वाढवणे यांचा समावेश आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारत आणि फ्रान्स द...

November 21, 2024 7:52 PM

views 16

देशानं गेल्या काही वर्षात निर्माण केलेल्या विश्वासामुळे भारत हा विकासाचं इंजिन ठरत आहे – पीयुष गोयल

देशानं गेल्या काही वर्षात निर्माण केलेल्या विश्वासामुळे भारत हा विकासाचं इंजिन ठरत आहे, असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी केलं. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिक्की  च्या ९७ वाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एका सत्राला ते आज संबोधित करत होते. भारत आणि भारताचा व्यापार हा जागतिक मूल्य साखळीचा एक अग्रेसर भाग बनत आहे आणि जागतिक व्यापार सहकार्यामध्ये  विश्वासू भागीदार ठरत आहे. सर्व उद्योग प्रतिनिधींनी नाविन्यपूर्ण आणि संशोधनास पूरक पर्यावरण विकसित करण्यास...