July 4, 2025 4:48 PM July 4, 2025 4:48 PM

views 5

उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २८ कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची मंत्री जितनराम मांझी यांची माहिती

गेल्या १० वर्षांत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २८ कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग- मंत्री जितनराम मांझी यांनी आज दिली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.    महिला आणि युवकांना आत्मनिर्भरतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार गॅरंटी योजना शहरी आणि ग्रामीण भागात राबविली जात आहे. यातून उद्यम पोर्टलवर नोंद केलेल्यांना प्रशिक्षण देऊन सबसिडीतून कर्ज उपलब्ध करू...

August 8, 2024 6:39 PM August 8, 2024 6:39 PM

views 3

उद्यम पोर्टलवर ४ कोटी ८० लाख नागरिकांची नोंदणी – मंत्री जीतन राम मांझी

उद्यम पोर्टलवर ४ कोटी ८० लाख जणांनी नोंदणी केली आहे असं लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी सांगितलं. उद्यम पोर्टल, पीएम विश्वकर्मा योजना आणि या क्षेत्रातील विविध उपक्रमांद्वारे २० कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचही त्यांनी म्हटलं आहे. क्रेडिट गॅरंटी स्कीम, आत्मनिर्भर योजना आणि इतर उपक्रमांतर्गत देशात रोजगाराच्या संधी वाढवण्याचा प्रयत्न सुरु असून रोजगार निर्मितीसाठी महिला आणि तरुणांवर विशेष भर देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.