डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २८ कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची मंत्री जितनराम मांझी यांची माहिती

गेल्या १० वर्षांत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २८ कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग- मंत्री जितनराम मांझी यांनी आज दिली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

महिला आणि युवकांना आत्मनिर्भरतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार गॅरंटी योजना शहरी आणि ग्रामीण भागात राबविली जात आहे. यातून उद्यम पोर्टलवर नोंद केलेल्यांना प्रशिक्षण देऊन सबसिडीतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. प्रधानमंत्री रोजगार गॅरंटी योजनेतून ८० टक्के ग्रामीण भागात तर २० टक्के शहरी भागात रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती मांझी यांनी दिली. गेल्या पाच वर्षांत नोंदणीकृत MSME युनिट्सची संख्या १५ पटींनी वाढली आहे. आजमितीला देशात एकूण ६ कोटी ५३ लाख MSME युनिट्स कार्यरत आहेत. तसंच, MSME युनिट्सना दिलेल्या कर्जंची रक्कमही चार पटींनी वाढल्याचं मांझी यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा