December 31, 2024 8:31 PM December 31, 2024 8:31 PM

views 6

‘हिंद-प्रशांत प्रदेशात स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्वाड महत्त्वाचा घटक’

हिंद-प्रशांत प्रदेशात स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्वाड एक महत्त्वाचा घटक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांच्यासोबत बैठक झाली असून हिंद-प्रशांत प्रदेशासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. क्वाड देश आता हिंद-प्रशांत प्रदेशाच्या सीमेपलीकडे जाऊन प्रश्न सोडवण्याचं काम करत आहेत, असं क्वाडच्या विसाव्या व...

November 27, 2024 1:08 PM November 27, 2024 1:08 PM

views 14

हिंद-प्रशांत प्रदेशात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

इटली इथे भरलेल्या जी सेव्हन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल सहभाग घेतला होता. हिंद-प्रशांत प्रदेशात नवीन भागीदारी, प्रश्न आणि संघर्ष या प्रमुख घटकांसह अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण बदल होत आहेत, असं जयशंकर या बैठकीत म्हणाले. या विषयाच्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांच्या प्रगतीचाही जयशंकर यांनी या बैठकीत उल्लेख केला. सागरी सुरक्षा, सेमी कंडक्टर्स, पुरवठा साखळी आणि कर्ज व्यवहार यांविषयीही जयशंकर यांनी या बैठकीत चर्चा केली.

September 6, 2024 8:14 PM September 6, 2024 8:14 PM

views 16

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. या भागातलं तेल आणि नैसर्गिक वायू महत्त्वाचं आहेच. पण त्यासोबतच या भागात हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया क्षेत्रातही प्रचंड संधी असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीत सीआयआयकडून आयोजित परिषदेत ते बोलत होते.