November 22, 2025 6:04 PM November 22, 2025 6:04 PM
9
२०२९ पर्यंत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आहे. २०२९ पर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही, असं मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केलं. गडचिरोली इथं भाजपच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं.त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.