विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शासकीय कार्यालयातल्या ई सेवा केंद्रातून शंभर आणि पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याने यापुढे अशी मागणी करू नये, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र पाठवून हे निर्देश जारी केले आहेत. शासकीय कार्यालयातल्या प्रमाणपत्रांसाठी आणि न्यायालयात सादर होणाऱ्या शपथपत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही, साध्या कागदावर स्वयं-प्रमाणित शपथपत्र सादर करणं पुरेसं आहे असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | June 7, 2025 8:06 PM | Minister Chandrashekhar Bawankule
कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश
