December 18, 2024 8:43 PM

views 20

पुणे आणि मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी-अश्विनी वैष्णव

पुणे आणि मनमाडदरम्यानच्या २४८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. तसंच नाशिक- साईनगर शिर्डी, पुणे-अहमदनगर आणि साईनगर - पुणतांबा या तीन मार्गांच्या सर्वेक्षणालाही मंजुरी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.  

December 11, 2024 3:05 PM

views 35

महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पुण्याहून रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण तसंच तिहेरीकरणाचं काम सुरु असून, रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारणार येणार आहे. त्यानंतर रेल्वे थांबे वाढवण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. राज्यात रेल्वेशी सं...

November 30, 2024 11:52 AM

views 35

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज गुजरात दौऱ्यावर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरतमधील किम इथं बुलेट ट्रेन ट्रॅक स्लॅब निर्मिती केंद्राला ते भेट देतील.   वडोदरा इथल्या प्लासेर इंडिया कारखान्यालाही मंत्री महोदय भेट देतील. त्यानंतर ते वडोदरा इथल्या गति शक्ती विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित राहणार असून समारंभात विविध शाखांतील एकूण 239 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

November 28, 2024 10:38 AM

views 19

‘समाजमाध्यम, ओटीटीवर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता’

समाज माध्यमं आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत आणि कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. ते काल लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते. आपल्या देशाची संस्कृती आणि हे प्लॅटफॉर्म जिथून आले आहेत त्या देशांत खूप फरक आहे, त्यामुळे, संसदेच्या संबंधित स्थायी समितीने हा मुद्दा उचलून धरावा आणि त्यासाठी कठोर कायदे करावेत अशी मागणी त्यांनी केली.

November 24, 2024 3:49 PM

views 24

अखिल भारतीय एससी-एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन

अखिल भारतीय एससी-एसटी अर्थात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने नागपूरच्या अजनी रेल्वे ग्राउंड इथं उद्या २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. उद्या सकाळी साडे आठ वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या संघटनेचे संरक्षक आणि केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

September 18, 2024 9:48 AM

views 22

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल – मंत्री अश्विनी वैष्णव

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. काल संध्याकाळी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन कोटी घरे दिली जाणार असून ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दरवर्षी ५ लाख रुपये मिळणार आहेत. रोजगार निर्मिती सुलभ करण्या...

August 28, 2024 9:46 AM

views 22

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – मंत्री अश्विनी वैष्णव

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 7 टक्के दराच्या आधारे बोलत होते. या अहवालानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 5 टक्के, अमेरिकेचा अंदाजे 2 पूर्णांक 6 टक्के इतका आहे. तर जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये इंडोनेशिया, तुर्की, रशिया, पोलंड, स्पेन आणि मेक्सिको या देशांचा स...

July 29, 2024 8:35 PM

views 30

राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं – मंत्री अश्विनी वैष्णव

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन, त्यांना राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं आहे, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. राहुल गांधी लोकसभेच्या सभापतींना सातत्यानं प्रश्न विचारत राहिले त्यांचं हे वर्तन निषेधार्ह असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे.