March 6, 2025 8:24 PM March 6, 2025 8:24 PM

views 10

AI कोश, AI Compute या वेबसाइटचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते अनावरण

AI अर्थात Artificial Intelligence साठीचा AI कोश, AI Compute या वेबसाइटचं अनावरण केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केलं. AI कोश च्या माध्यमातून विविध डेटा, टूल्स आणि AI मॉड़ेल्स संगणक तंत्रज्ञांना उपलब्ध होती. AI COMPUTE या वेबसाइटवर GPUs आणि इतर क्लाऊड सुविधा विद्यार्थी, स्टार्टअप, संशोधक आणि सरकारी विभागांना उपलब्ध होतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी i Got पोर्टलवर AI चा उपयोग करुन विविध अभ्यासक्रम सुचवण्याच्या सुविधेची सुरुवातही...

February 16, 2025 9:26 AM February 16, 2025 9:26 AM

views 15

कमी-मध्यम उत्पन्न गटांमुळे अर्थव्यवस्थेला जलद गती मिळाली – मंत्री अश्विनी वैष्णव

कमी आणि मध्यम उत्पन्न गटांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे अर्थव्यवस्थेला जलद गतीने वाढण्याकरता मदत झाल्याचं रेल्वे आणि माहिती - प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलतांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, तसंच कमी आणि मध्यम उत्पन्न गटांवर लक्ष केंद्रित करणे या सर्वांमुळे सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली आहे. मोठ्या प्रमाणात कर कपातीमुळे मध्यमवर्गाला फायदा झाला आहे. यूपीएच्या काळात गुंतवणुकीची रक्कम फक्त अडीच ला...

February 10, 2025 10:11 AM February 10, 2025 10:11 AM

views 17

रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येणार -रेल्वेमंत्री

रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बिहारमधील बेतिहा इथं सांगितलं. नुकत्याच झालेल्या दिड लाख भरतीप्रक्रियेव्यतिरिक्त या जागांची भरती होईल असंही त्यानी स्पष्ट केलं.   नमो आणि वंदे भारत रेल्वेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या रेल्वेगाड्यांचं उद्पादन वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. बिहारमध्ये सरकार 95 हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामुळे बिहार रेल्वेक्षेत्रात मोठा बदल अपेक्षित आहेत असंही ते म्हणाले.

February 3, 2025 8:46 PM February 3, 2025 8:46 PM

views 9

अर्थसंकल्पामध्ये देशातल्या रेल्वेसाठी २५२२०० कोटी रुपयांची तरतूद

देशातल्या रेल्वेच्या विकास आणि कार्यक्षमता वाढीसाठी अर्थसंकल्पामध्ये २ लाख ५२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी नवीन रेल्वे मार्गांसाठी ३२ हजार २३५ कोटी रुपये, मार्गिकांच्या नूतनीकरणासाठी २२ हजार ८०० कोटी आणि रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी ३२ हजार कोटींची तरतूद आहे. १६ हजार २४० कोटींची नवीन रेल्वे मार्गिकांची कामं सुरु आहेत. या आर्थिक वर्षात ५० नव्या नमो भारत गाड्या, १०० नव्या अमृत भारत गाड्या आणि २०० नव्या वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना आहे.

January 30, 2025 8:24 PM January 30, 2025 8:24 PM

views 7

येत्या काही महिन्यात देशाची स्वतःची एआय प्रणाली विकसित होईल- अश्विनी वैष्णव

भारत येत्या काही वर्षांत स्वतःची एआय प्रणाली विकसित करेल, असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वक्त केला. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वैष्णव म्हणाले की, भारताने विकसित केलेलं हे तंत्रज्ञान जगातल्या सर्वोत्तम एआय तंत्रज्ञानाशी स्पर्धा करू शकेल. यासाठी लवकरच प्रस्ताव मागवण्यात येणार असून या सर्व तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी संस्थाही स्थापन केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

January 18, 2025 8:35 PM January 18, 2025 8:35 PM

views 8

तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी केंद्र सरकारनं विविध उपक्रम राबवले-अश्विनी वैष्णव

देशात तंत्रज्ञानावर कोणत्याही विशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी असू नये, तर ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावं, तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण व्हावं, हे उद्दिष्ट ठेवून गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. मुंबईत पॅन-आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी परिषदेच्या समारोप सत्रात ते आज बोलत होते.  पुढच्या १० वर्षांमध्ये संपूर्ण जगात मोठे राजकीय, भौगोलिक, आर्थिक बदल घडून येतील आणि येणारी कि...

January 10, 2025 1:25 PM January 10, 2025 1:25 PM

views 9

केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्याने रेल्वेगाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार – मंत्री अश्विनी वैष्णव

मेक इन इंडिया योजनेंतर्गत केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्याने रेल्वेगाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. तामिळनाडूमध्ये तिरुवल्लूर इथे दोन कंपन्यांच्या चाक निर्मिती विभागांना भेट दिल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सध्या रेल्वेला ८० हजारांहून अधिक उच्च शक्तीच्या चाकांची गरज आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून या निर्मितीला सुरुवात होईल. या चाकांचा वापर देशांतर्गत रेल्वे गाड्यांसाठी केला जाईल तसंच इतर देशांमध्येही त्याची निर...

January 4, 2025 8:13 PM January 4, 2025 8:13 PM

views 10

विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या काळात ताण न घेता ध्यासवृत्ती जोपासावी-अश्विनी वैष्णव

विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या काळात ताण न घेता ध्यासवृत्ती जोपासावी असा सल्ला  केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत आयोजित एक्झॅम वॉरिअर्स कला महोत्सवात आज त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. अभिनेता आणि खेळाडू स्वतःच्या कामाचा ध्यास घेत असल्यानं ते उत्कृष्ट कामगिरीचं दर्शन घडवतात, असं ते म्हणाले. या महोत्सवात विविध शाळांमधल्या ५ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

December 24, 2024 3:00 PM December 24, 2024 3:00 PM

views 8

स्मार्टफोनच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी वाढ -अश्विनी वैष्णव

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये १ लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या स्मार्टफोनची निर्यात केली असल्याचं इलेक्ट्रॅानिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातल्या स्मार्टफोनची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी वाढल्याची माहिती त्यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

December 18, 2024 8:43 PM December 18, 2024 8:43 PM

views 10

पुणे आणि मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी-अश्विनी वैष्णव

पुणे आणि मनमाडदरम्यानच्या २४८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. तसंच नाशिक- साईनगर शिर्डी, पुणे-अहमदनगर आणि साईनगर - पुणतांबा या तीन मार्गांच्या सर्वेक्षणालाही मंजुरी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.