July 10, 2025 9:14 AM

views 19

पूर्व विभागीय परिषदेची गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रांची इथं 27 व्या पूर्व विभागीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीत झारखंड, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या चार पूर्वेकडील राज्यांतील 70 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील प्रलंबित आंतरराज्यीय मुद्द्यांवर चर्चा आणि मागील परिषदेच्या बैठकींमध्ये घेतलेल्या निर्णयांवरील प्रगतीचा आढावा घेतला जाईल. राज्य सरकारने 20 हून अधिक मुद्यांची कार्यसूची तयार केली आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून किमान सव्वा लाख कोटी रुपयांच्या प्रलंबित थक...

June 20, 2025 6:57 PM

views 16

कायदे, पायाभूत सुविधांची मागणी तसंच अडचणी सरकारसमोर मांडणाऱ्या संस्था गरजेच्या – मंत्री अमित शाह

भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन सरकारकडे धोरण, कायदे आणि पायाभूत सुविधांची मागणी करणाऱ्या, आपल्या अडचणी सरकारसमोर मांडणाऱ्या संस्था गरजेच्या असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचं नूतनीकृत मुख्यालय आणि सहकारी औद्योगिक वसाहत राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या गेल्या १०० वर्षांच्या वाटचालीदरम्यान आजूबाजूची सगळी परिस्थिती अमूलाग्र बदलली असून त्या ब...

May 26, 2025 3:38 PM

views 30

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली. नॅशनल कँसर इन्सिट्यूट ही आगामी काळात देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूटपैकी एक असेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.  मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश स्वस्ती आणि तेलंगणा या सर्व ठिकाणचे रुग्ण इथे उपचार घेऊ शकतील याबद्दल शाह यांनी समाधान व्यक्त केलं.  गेल्या दहा वर्षात देशातलं वैद्यकीय क्षेत्राचं चित्र बदललं असल्...

March 30, 2025 2:14 PM

views 20

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये ८०० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधे सुमारे ८०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन केलं. सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या १११ कोटी रुपये खर्चाच्या आणि नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीतल्या ४२१ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. पोलिसांसाठीच्या सदनिकांचं तसंच ३ महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाची कोनशिला त्यांनी बसवली.   दरभंगा इथल्या मच्छिमार सहकारी संस्थेत मखाणा प्रक्रीया उद्योगाचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीने केलं. बिहार ...

March 27, 2025 8:25 PM

views 30

देशात लवकरच सहकारी तत्त्वावर ‘टॅक्सी सेवा’

उबर आणि ओला या टॅक्सीसेवांच्या धर्तीवर केंद्र सरकार सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. लोकसभेत आज चर्चेदरम्यान शहा यांनी ही घोषणा केली आहे. तसंच, सरकार लवकरच एका विमा कंपनीची स्थापना करणार असून ही कंपनी देशातल्या सहकारी व्यवस्थेतले विम्याचे व्यवहार हाताळेल, असंही शहा म्हणाले. 

March 16, 2025 7:34 PM

views 23

बोडोलँड प्रदेशाच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध – गृहमंत्री अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार बोडोलँड प्रदेशाच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आसामधल्ये कोक्राझार इथं ऑल बोडो स्टुडन्ट्स युनियनच्या ५७ व्या वार्षिक परिषदेला आज संबोधित करत होते. बोडो करारातल्या सर्व अटी पूर्ण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून ८२ टक्के अटी पूर्ण झाल्या आहेत, असं गृहमंत्री म्हणाले. बोडोलँड प्रदेश आधी हिंसाचारासाठी ओळखला जायचा, मात्र इथले युवक आता मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत, या प्रदेशात शांतता प्रस्...

March 3, 2025 2:40 PM

views 21

ग्रामीण भागाला समृद्ध बनवण्यासाठी दुग्धोत्पादनाचं मोठं योगदान – मंत्री अमित शाह

दुग्धोत्पादन क्षेत्र देशाच्या विकासाला गती देत असून ग्रामीण भागाला समृद्ध बनवण्यासाठी दुग्धोत्पादन क्षेत्राचं मोठं योगदान असल्याचं मत केंद्रीय गृृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं ‘दुग्धोत्पादन क्षेत्रात शाश्वतता आणि वितरण क्षमता’ या विषयावर आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन केलं. श्वेतक्रांती २ च्या दिशेनं देश वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले. गावाकडून शहरांकडे होणारं स्थलांतर रोखण्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं गरजेचं असून त्यासाठी दुग्धोत्पादन...

February 25, 2025 9:51 AM

views 20

जम्मू-काश्मीरमधल्या युवा पिढीशी केंद्रीय गृहमंत्र्यांचा संवाद

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वतन को जानो या कार्यक्रमाअंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या युवा पिढीशी संवाद साधला. जम्मू आणि काश्मीरमधले २५० महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी नवी दिल्लीत आले आहेत. कलम ३७० रद्द करुन केंद्र सरकारनं देश एकसंध केला असून आता जम्मू काश्मीरमधल्या जनतेला देशातल्या अन्य राज्यांमधल्या नागरिकांप्रमाणेच सगळे अधिकार मिळतील असं शहा म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांशी, नातेवाईकांशी शांतता, सलोखा आणि विकासाबा...

February 21, 2025 7:34 PM

views 20

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीचं अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत. लैंगिक शोषण, महिला अत्याचारांच्या प्रकरणांच्या जलद तपासासाठी जलदगती विशेष न्यायालयांची स्थापन करणं, आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीची अंमलबजावणी, पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दे, यासह विविध मुद्द्यांवर या परिषदेत विचारमंथन अपेक्षित आहे.    आपल्या पुणे दौऱ्यात अमित शहा जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभालाही उ...

February 13, 2025 1:14 PM

views 23

सहकारी संस्थांच्या एकसमान आणि संतुलित विकासासाठी सरकारच्या विशेष उपाययोजना

राज्यांमधल्या सहकारी संस्थांचा एकसमान आणि संतुलित विकास व्हावा, यासाठी  सरकार विशेष उपाययोजना करत असल्याचं सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत बोलत होते. देशातल्या सहकारी संस्थांच्या विकासात असलेला  प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत असून राष्ट्रीय सहकारी डेटाबेस विकसित करण्याचं काम जवळजवळ पूर्ण झालं त्यांनी यावेळी सांगितलं.  प्रदेशानुसार वर्गवारी केलेल्या देशभरातल्या सहकारी संस्थांची माहिती आता ...