July 4, 2025 8:03 PM July 4, 2025 8:03 PM

भारतानं कायमच सर्व धर्मियांच्या स्वातंत्र्याचं समर्थन केलं आहे आणि भविष्यातही केलं जाईल-MEA

भारतानं कायमच सर्व धर्मियांच्या स्वातंत्र्याचं समर्थन केलं आहे आणि भविष्यातही ते केलं जाईल, असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी अलिकडेच केलेल्या विधानांसंदर्भात जयस्वाल यांना विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.    दलाई लामा संस्था आणि दलाई लामा यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत भारत सरकार कोणताही हस्तक्षेप अथवा प्रतिक्रिया देणार नसल्याचंही जयस्वाल यांनी सांगितलं. 

March 8, 2025 9:14 PM March 8, 2025 9:14 PM

views 13

प्रधानमंत्री येत्या ११ तारखेपासून मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार

भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार व्यापार करारावर चर्चा पुढे नेण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. गेल्या महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळीच दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य, बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्याविषयी जाहीर करण्यात आलं होतं. या चर्चेचा उद्देश व्यापार मजबूत करणं, बाजारपेठेत आणखी संधी उपलब्ध करून देणं तसंच करांसारख्या शुल्कांच...

March 2, 2025 6:50 PM March 2, 2025 6:50 PM

views 10

NHRC : आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रशिक्षण कार्यक्रम उद्यापासून नवी दिल्लीत

मानवाधिकार क्षेत्रात तंत्रविषयक आणि आर्थिक सहकार्यातून क्षमतावाढ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रशिक्षण कार्यक्रम उद्यापासून नवी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि परराष्ट्रव्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात १४ विविध देशातले मिलून ४७ प्रतिनिधी सहभागी होणार असून तो येत्या ८ मार्चपर्यंत चालेल. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमणियन यांच्या हस्ते उद्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. 

February 23, 2025 6:45 PM February 23, 2025 6:45 PM

views 12

संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत महिला शांतीरक्षक सहभागी होणार

“शांतता राखण्यात महिलांचा सहभाग: एक जागतिक दक्षिण दृष्टीकोन” या विषयावर उद्यापासून नवी दिल्लीत होणाऱ्या परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत सहभागी असलेल्या महिला शांतीरक्षक सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि CUNPK अर्थात, संयुक्त राष्ट्रांचं शांतीस्थापना केंद्र यांनी संयुक्तपणे या दोन दिवसांच्या ही परिषदेचं आयोजन केलं आहे. शांती मोहिमेत ग्लोबल साऊथमधल्या ३५ देशांमधून सैन्य योगदान देणाऱ्या महिला शांतीरक्षक या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ...

September 13, 2024 1:24 PM September 13, 2024 1:24 PM

views 6

रशियन सैन्यातून 35 भारतीय नागरिकांची सुटका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यानंतर 35 भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही माहिती दिली. मोदी यांच्या भेटीपूर्वी १० भारतीय नागरिकांना सोडण्यात आलं होतं. त्यामुळं सुटका झालेल्या भारतीयांची एकूण संख्या ४५ वर पोहोचली आहे. सुमारे 50 भारतीय नागरिक अजूनही रशियन सैन्यात आहेत आणि त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी केद्र सरकार प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.