November 19, 2024 9:31 AM November 19, 2024 9:31 AM

views 9

मणिपूरमध्ये CAPFच्या ५० अतिरिक्त तुकड्या तैनात करणार

मणिपूरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल विविध स्तरावरील अधिकाऱ्यांबरोबर उच्च स्तरीय आढावा बैठक घेतली. केंद्रिय सशस्त्र पोलीस दल अर्थात CAPFच्या ५०अतिरिक्त तुकड्या मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली. राज्यात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आवश्यक ती पावलं उचलावीत अशा सुचना शहा यांनी दिल्या.

September 17, 2024 2:08 PM September 17, 2024 2:08 PM

views 13

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमीत्त त्यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी संवाद साधला. मणिपूरमधला हिंसाचार वांशिक स्वरुपाचा आहे, आणि तो रोखण्यासाठी सरकार कुकी आणि मैतेई या दोन्ही समुदायांसोबत चर्चा करत आहे, असं त्यांनी सांगितलं. तिथली परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त क...

September 7, 2024 1:18 PM September 7, 2024 1:18 PM

views 17

मणिपूरमध्ये आज झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये आज सकाळपासून झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जरिबाम जिल्ह्यात एका व्यक्तीला, तो घराबाहेर झोपला असता गोळी घालण्यात आली. नंगचेपी भागात दोन गटात झालेल्या हिंसाचारात तीन दहशतवाद्यांसह चार जणांचा मृत्यू झाला. तांगजेंग खुजाओ भागात दोन जण जखमी झाले. मोयरांग शहरात झालेल्या एका गावठी बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले. काल रात्री विविध ठिकाणी तैनात असलेल्या मणिपूर रायफल्सच्या तुकड्यांना जमावांनी घेराव घालून त्यांच्य...

September 2, 2024 1:29 PM September 2, 2024 1:29 PM

views 11

मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार

मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांनी इम्फाळ वेस्ट जिल्ह्यातल्या कौत्रुक या गावावर काल केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. मृतांमधे एका महिलेचा समावेश असून तिची आठ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.   दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. निःशस्त्र गावकऱ्यांवर कुकी अतिरेक्यांनी केलेला हा हल्ला म्हणजे राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या सरकारचे प्रयत्न अयशस्वी करण्याचा प्रयत्न असल्याचं गृह विभागानं म्हटलं आहे.

August 7, 2024 1:32 PM August 7, 2024 1:32 PM

views 7

फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू

बांगलादेशातून होणाऱ्या संभाव्य बेकायदेशीर स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्य सरकारने फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले.   बंदुक, तलवार, काठी, दगड किवा कुठलंही धारदार शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. जिरिबाम जिल्ह्यात जिरिबाम नगरपरिषद आणि बोरोबेका उप विभागाच्या हद्दीत सकाळी ९ ते दुपारी तीन या वेळेत या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे.

July 22, 2024 2:49 PM July 22, 2024 2:49 PM

views 10

मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये तसंच दुर्गम भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी करत राबवली शोधमोहीम

मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये तसंच दुर्गम भागांमध्ये आज पोलिसांनी छापेमारी करत शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत विविध कलमांतर्गत ४७ जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त असून विविध जिल्ह्यांमध्ये १०२ ठिकाणांवर पोलिसांनी नाकेबंदी करत चौक्या उभारल्या आहेत.