March 22, 2025 5:24 PM March 22, 2025 5:24 PM

views 16

मणिपूरमधे शांतता आणि सौहार्दसाठी एकत्रित काम करण्याचं न्या. भूषण गवई यांचं आवाहन

मणिपूरमधे शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी तिथल्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे,  असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ आज हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं. गवई यांनी विक्रम नाथ, एम एम सुंद्रेश आणि के व्ही विश्वनाथन यांनी छुराचांदपूर जिल्ह्यातल्या मदत छावणीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय राज्यघटनेनं सर्व नागरिकांना समान अधिकारांची हमी दिली आहे, असंही ते म्हणाले.   गवई अध्यक्ष ...

March 11, 2025 3:57 PM March 11, 2025 3:57 PM

views 11

लोकसभेत मणिपूरच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

लोकसभेत चालू आर्थिक वर्षातल्या पुरवणी मागण्या आणि मणिपूरच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. ५१ हजार ४६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारनं मांडल्या आहेत. या चर्चेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी भारत आणि अमेरिके दरम्यान कथित टॅरिफ युद्ध, असंघटित कामगार आणि मेक इन इंडिया यासारख्या विषयांवर सरकारला प्रश्न विचारले.   राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांनी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य वृद्धीवर मत व्यक्त केलं. विद्यापीठांमध्ये...

March 9, 2025 1:29 PM March 9, 2025 1:29 PM

views 11

मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांची शोधमोहिम

मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री जप्त केली. मणिपूरमध्ये जिरीबाम, तेंग्नोपाल, काकचिंग, उखरुल, इम्फाळ पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगराळ तसंच सखल भागातल्या जिल्ह्यांमध्ये मणिपूर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपीच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २५ शस्त्रं, आयईडी, ग्रेनेड, दारुगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली. तसंच, कांगपोकपी जिल्ह्यातले बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले. 

March 1, 2025 8:03 PM March 1, 2025 8:03 PM

views 11

मणिपूरमधे ८ मार्चपासून सर्वांना मुक्तपणे वावरता येण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश

मणिपूरमधे येत्या ८ मार्च पासून सर्व रस्त्यांवर सर्वांना मुक्तपणे वावरता यावं याची काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिले. मणिपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.   रस्त्यांवर वाहतुकीला अडथळे आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच मणिपूरमधल्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगत कुंपण घालण्याचं काम लौकरात लौकर पूर्ण करावं असं त्यांनी सांगितलं. मणिपूरला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर ...

February 20, 2025 1:12 PM February 20, 2025 1:12 PM

views 17

मणिपूरमधे ४ दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमधल्या चुराचंदपूर, थौबल आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या संघटनाच्या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातला एक जण युनायटेड कुकी नॅशनल आर्मीचा सदस्य आहे, तर बाकीचे तिघं कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मागच्या दोन दिवसांत शस्रास्त्र आणि दारूगोळा जप्त केला आहे.

February 14, 2025 9:37 AM February 14, 2025 9:37 AM

views 55

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. गृह मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मणिपूरच्या राज्यपालांकडून अहवाल प्राप्त झाला होता आणि या अहवालावर विचार केल्यानंतर, घटनेच्या कलम 356 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे.

January 21, 2025 1:16 PM January 21, 2025 1:16 PM

views 14

मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांचा आज स्थापनादिवस; राषट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांचा स्थापनादिवस आज साजरा होत आहे. राषट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही राज्यांना स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  या राज्यांमधल्या कष्टाळू आणि उद्योगी नागरिकांनी देशाच्या विकासात हातभार लावला असल्याचं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. भारताची ही तीन झगमगती रत्नं समृद्ध वारशाची आणि विविधतेत एकता या वैशिष्ट्याची प्रतिकं असल्याचं उपराषट्रपतींनी म्हटलं आहे. मणिपूरच्या जनतेने राष्ट्रविकास...

January 3, 2025 2:22 PM January 3, 2025 2:22 PM

views 25

केंद्रीय गृहविभागाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला यांनी मणिपूरचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ

केंद्रीय गृहविभागाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला यांनी आज मणिपूरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मणिपूर उच्च न्यायालयाचे मुक्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग, विधानसभा अध्यक्ष, मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर आमदार शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. भल्ला भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८४ च्या तुकडीतले आधिकारी होते.

January 1, 2025 2:30 PM January 1, 2025 2:30 PM

views 4

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार आहे. मुख्यमंत्री उद्योजकता सहाय्य योजनेतून हे कर्ज देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी काल केली. या योजनेअंतर्गत याआधीच ४२६ लोकांना व्यवसायासाठी कर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं.

November 26, 2024 8:01 PM November 26, 2024 8:01 PM

views 11

NIA: मणिपूरमधे अलिकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या ३ प्रकरणांची चौकशी

मणिपूरमधे अलिकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या ३ प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सुरु केली आहे. यातल्या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने एनआयए कडे तपास सुपूर्द केल्यानंतर तिन्ही प्रकरणात नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या २१ आणि २२ नोव्हेंबरला एनआयएच्या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. सध्या एनआयए कडे प्रकरणातली कागदपत्र सोपवण्याची प्रक्रीया सुरु आहे.