July 9, 2025 9:26 AM

views 16

राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं पुराची शक्यता लक्षात घेत १८ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली लहान नौका उल...

July 8, 2025 3:12 PM

views 13

राज्याच्या विविध भागात पाऊस

राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.  गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळे तिरोडा तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसामुळे  जिल्ह्यातले २१ मार्गांवरची वाहतूक ठप्प झाल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली.   गडचिरोली जिल्ह्यातही रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून, नद्या- नाल्यांना पूर आल्यानं १६ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. द...

July 8, 2025 3:29 PM

views 24

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० % वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातल्या अर्धशतक पार केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान मंजूर करायलाही मान्यता मिळाली आहे.   राज्यातल्या विद्यापीठं आणि अशासकीय महाविद्यालयांमधल्या रिक्त पदांची भरती, शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरती या मागण्यांनाही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे...

July 7, 2025 3:15 PM

views 20

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचे उमेदवार घोषित

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलनं आपले उमेदवार घोषित केले आहेत. आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे या पॅनलचं नेतृत्व करत आहेत. मतदान होण्यापूर्वीच या पॅनेलचे प्रविण दरेकर, गुलाबराव मगर आणि प्रकाश दरेकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संघात समन्वयानं काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कुसाळकर आणि दरेकर ही निवडणूक एकत्र लढवत आहेत.

July 7, 2025 8:17 PM

views 18

तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

महाराष्ट्रात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. त्यावरच्या प्रश्नादरम्यान अध्यक्षांनी या सूचना केल्या.    नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा इथे सुरू असलेल्या तेल भेसळीप्रकरणी संबंधित कारखाना तातडीने बंद करून संबंधित अन्न आणि औषध प्रशासन सह आयुक्त तसेच सहाय्यक आयुक्त यांना...

July 6, 2025 7:28 PM

views 24

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळनं पटकावलं सुवर्ण पदक

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यानं आज सुवर्णपदक पटकावलं. अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या ए. एस. जोसेफ याचा ११-८ असा पराभव केला. याच प्रकारात महाराष्ट्रच्याच अरोह जाधव आणि पंजाबच्या हेयांश गर्ग यांना संयुक्तपणे कांस्य पदक मिळालं. आजच्या पदकं प्राप्त केलेल्या खेळाडूंना या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे असलेले आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता, आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पदकं आणि प्रमाणपत्रं प्रदान करून सन्मानित कर...

July 2, 2025 3:18 PM

views 21

शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी शेतकरी न्यायालयाचा राज्य सरकारचा प्रस्ताव

राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग, ईओडब्ल्यू आणि ग्राहक न्यायालयाच्या धर्तीवर शेतकरी न्यायालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सोयाबीन खरेदीसाठी २ केंद्रं निश्चित केली असून तिथं सुमारे पाच हजार पाचशे कोटी रुपयांची खरेदी झाल्याची माहिती त्यांनी आज विधासभेत दिली. सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या व...

July 2, 2025 2:07 PM

views 19

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. भूस्खलनात परतीचा मार्ग वाहून गेल्यामुळे २८ जूनपासून उत्तराखंडमधील यमुनोत्री धामजवळ जानकी छट्टी गावात महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक अडकले आहेत. भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात, राजस्थान तसंच महाराष्ट्राच्या काही भागांसह, उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण, गोवा,...

June 30, 2025 3:27 PM

views 188

राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती

वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असून  कुमार यांची  नियुक्ती करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

June 22, 2025 7:12 PM

views 16

व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्यार्थिनींसाठी मोफत

व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्यार्थिनींसाठी मोफत असल्यानं त्यासाठी कोणतंही शुल्क आकारू नये, असे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थिनींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं आज बैठक झाली. यात मंत्री पाटील यांनी हे आदेश दिले. गेल्यावर्षी संस्थांनी शुल्क आकारलं असेल तर ते परत करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या. शुल्क आकारणीबाबतच्या समस्यांच्या निवारणासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने मदतक्रम...